अॅडलेड कसोटीवर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पाच फलंदाज गमावून १२८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३७ धावा करून १५७ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी सुमार कामगिरी करत १२८ धावांवर पाच फलंदाज गमावले. भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा २९ धावांनी मागे आहे. यष्टीमागे ऋषभ पंत (२८) आणि नितीश रेड्डी (१५) खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी दोन, तर मिचेल स्टार्कने एक विकेट घेतली. (IND vs AUS Test)

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला सर्वबाद केल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाची फलंदाजांनी सुमार कामगिरी केली. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही सलामीची जोडी अपयशी ठरली. राहुल पहिला बाद झाला, त्याला कमिन्सने सात धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर बोलंडने यशस्वी (२४) आणि विराट कोहलीला (११) बाद करून भारताला दुहेरी धक्का दिला. शुभमन गिललाही मोठी खेळी करता आली नाही. दुसऱ्या डावातही कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म कायम राहिला, तो कमिन्सच्या चेंडूवर सहा धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. (IND vs AUS Test)

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३७ धावा केल्या होत्या. तर, भारताने पहिल्या डावात १८० धावा केल्या होत्या. ट्रॅव्हिस हेडने १४० धावांची शानदार खेळी केली. तर भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाने शनिवारी एका विकेटवर ८६ धावांवर खेळ सुरू केला आणि शेवटच्या नऊ विकेट गमावून २५१ धावा केल्या. सलामीच्या सत्रात संघाने मॅकस्विनी (३९), स्टीव्ह स्मिथ (२) आणि मार्नस लॅबुशेन यांच्या रूपाने तीन विकेट गमावल्या. लॅबुशेनने ६४ धावा केल्या. मॅकस्विनी आणि स्मिथला बुमराहने बाद केले, तर लॅबुशेनला नितीश रेड्डीने बाद केले.

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत