पहिल्या दिवशी पावसाचा खेळ

कॅनबेरा : भारत आणि प्राइम मिनिस्टर्स इलेव्हन यांच्यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय सराव सामन्याच्या पहिला दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील अडलेड येथील दुसरा सामना गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र खेळवण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सराव सामनाही गुलाब चेंडूवर खेळवण्याचे नियोजन आहे. तथापि, शनिवारी दिवसभर पाऊस असल्याने मैदान अच्छादित ठेवण्यात आले. रविवारी खेळ होऊ शकल्यास दोन्ही संघांमध्ये ५० षटकांचा सामना खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. (IND vs AUS)

Related posts

Indian women’s win : भारताचा मोठा विजय

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!