महानगर गॅसच्या किमतीत वाढ

मुंबई :  महानगर गॅस लिमिटेडने केलेल्या घोषणेनुसार, राज्यात ‘सीएनजी’च्या किमती दोन रुपये किलोने वाढल्या आहेत. मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणी या नवीन किमती लागू करण्यात आल्या आहेत. मुंबईत आधी ‘सीएनजी’ची किमत ७५ रुपये प्रतिकिलो होती. त्यानंतर आता यात दोन रुपयांनी वाढ झाली असून आता सीएनजी ७७ रुपये प्रतिकिलोवर विकले जाणार आहे. ‘सीएनजी’च्या किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. ‘सीएनजी’च्या किमती वाढल्याने टॅक्सी, ऑटो रिक्षा चालकांवर चांगलाच परिणाम होणार आहे. टॅक्सी, ऑटो रिक्षा या सीएनजी गॅसवर चालतात. तसेच देशात डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमध्ये सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने वाहनचालकांसह प्रवाशांनाही फटका बसू शकतो. (CNG)

Related posts

सांगलीच्या पटवर्धन घराण्यांतील वादाला सव्वादोनशे वर्षांची परंपरा

माधुरीची घरवापसीः वर्षभराच्या लोकलढ्यानंतर हत्तीण पुन्हा नांदणीत

गोकुळमध्ये मोठा भाऊ, महायुतीचे गोडवे गाऊ