कोल्हापूर : एचआयव्ही संसर्गित व्यक्तीशी भेदभाव न करता त्याच्याशी योग्य वर्तन केल्यास अशा व्यक्तीला आरोग्यदायी आयुष्य जगता येते. इतरांनीही अशा व्यक्तीला समजून घेण्याची गरज आहे, असे मत सीपीआर हॉस्पिटलच्या आयसीटीसी समुपदेशक मंगल माने यांनी व्यक्त केले. (HIV awareness programme)
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या सूचनेनुसार नियंत्रण आणि जिल्हा एड्स नियंत्रण पथक (दिशा) कोल्हापूरमार्फत गाव, कॉलेज, शाळा पातळीवर प्रशिक्षण आणि संवेदीकरण कार्यक्रम झाला. त्यावेळी माने बोलत होत्या.
एचआयव्ही, एड्स मार्ग, प्रसार व्यक्तीने समजून घेतल्यास आणि व्यक्तिगत जीवनात आचरणात आणल्यास एचआयव्ही प्रसार रोखता येतो, असे त्या म्हणाल्या. (HIV awareness programme)
एचआयव्ही प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा २०१७ नुसार एचआयव्ही संसर्गित व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण कशा प्रकारे होते, याची माहितीही त्यांनी दिली.
कॉलेज व शाळकरी मुलांनी मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर रहावे. योग्य जीवनशैली आत्मसात केल्यास आपले इच्छित ध्येय प्राप्त करता येते. यावेळी एसटीआय आरटीआय या आजाराविषयी माहिती देण्यात आली व मुलांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. (HIV awareness programme)
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये सरनोबतवाडी सरपंच शुभांगी अडसूळ, उपसरपंच विजया कांबळे, ग्रा.पं. सदस्य व गावकरी तसेच उजळवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, डॉ. सोनिया कोळी, आरोग्य सेविका रूपाली डोंगरे व अंगणवाडी सेविका तसेच आय.टी.आय कोल्हापूर कॉलेजचे प्रा. महेश आवटी, भालेराव, पोवार व सुतार, श्री साई समर्थ हायस्कूल सरनोबतवाडी, मा.मुख्याध्यापिका हेमा पोळ व शिक्षकेतर कर्मचारी व प्रायव्हेट हायस्कूलचे, मुख्याध्यापक जी.एस. जांभळीकर, उपमुख्याध्यापक पी. एम.जोशी, जेष्ठ शिक्षिका चव्हाण आदींचे सहकार्य लाभले.