Hitesh bags gold : हितेश गुलियाचा सुवर्ण‘पंच’

Hitesh bags gold

Hitesh bags gold

ब्राझिलिया : भारताचा बॉक्सर हितेश गुलियाने रविवारी वर्ल्ड बॉक्सिंग कप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरणारा तो भारताचा पहिलाच बॉक्सर ठरला. या स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, एक रौप्य व चार ब्राँझ अशा एकूण सहा पदकांची कमाई केली. (Hitesh bags gold)

ब्राझीलच्या फॉझदो इगुआकू येथे ही स्पर्धा रंगली. स्पर्धेमध्ये पुरुषांच्या ७० किलो गटात हितेशने फ्रान्सच्या माकन ट्रॅओरला ५-० असे पराभूत करून अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीमध्ये त्याचा सामना इंग्लंडच्या ओडेल कॅमाराशी होणार होता. तथापि, ओडेलने दुखापतग्रस्त असल्याने अंतिम फेरीतून माघार घेतली व परिणामी, हितेशचे सुवर्णपदक निश्चित झाले. या स्पर्धेपूर्वी, ब्राझीलमध्येच झालेल्या दहा दिवसांच्या सराव शिबिराचा आपल्याला फायदा झाल्याची प्रतिक्रिया हितेशने सुवर्णपदक जिंकल्यानंतर दिली. या सराव शिबिरामुळे काही तांत्रिक बारकावे शिकण्यास मला मदत झाली. या स्पर्धेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभव मिळाला. आगामी स्पर्धांमध्ये हा अनुभव उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया हितेशने दिली. (Hitesh bags gold)

भारताच्या अभिनाश जामवालनेही या स्पर्धेमध्ये ६५ किलो गटातून अंतिम फेरी गाठली होती. तथापि, अंतिम फेरीत यजमान ब्राझीलच्या युरी रेईसकडून पराभूत झाल्यामुळे अभिनाशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. याशिवाय, भारताच्या जदुमणी सिंह मांदेंगबाम (५० किलो), मनीष राठोड (५५ किलो), सचिन (६० किलो), विशाल (९० किलो) यांनी ब्राँझपदक जिंकले. या स्पर्धेमध्ये एकूण १९ देशांचे १३० बॉक्सर सहभागी झाले होते. भारतीय बॉक्सरनी पुरुषांच्या १० वजनी गटांमध्ये सहभाग नोंदवला. या वर्षी आणखी दोन बॉक्सिंग वर्ल्ड कप होणार असून त्यापैकी एक भारतामध्ये रंगणार आहे. कझाखस्तानमध्ये जून-जुलैदरम्यान, तर भारतात नोव्हेंबर महिन्यात वर्ल्ड बॉक्सिंग कप होणार आहेत. या स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी करणारे बॉक्सर वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्ससाठी पात्र ठरतील. (Hitesh bags gold)

हेही वाचा : 

 आवडत्या क्षेत्रात  झोकून द्या : राही सरनोबत

Related posts

India’s major decisions

India’s major decisions: सिंधू करार स्थगित, अटारी चेक पोस्ट बंद

Luxury Goods

Luxury Goods : महागड्या वस्तू घेताय?… १% टीसीएस लागू

Rajnath

Rajnath : आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू