न्यू यॉर्क : पर्यटनासाठी कुटुंबाला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर येथील हडसन नदीत कोसळले. या दुर्घटनेत तीन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. यातील दाम्पत्य सीमेन्समध्ये अधिकारीपदावर होते. (Helicopter crash)
अधिकाऱ्यांनी अद्याप ओळख जाहीर केलेली नसली तरी त्यांची नावे ऑगस्टिन एस्कोबार आणि त्यांची पत्नी मर्से कॅम्परुबी मोंटल अशी आहेत. अपघतात त्यांची तीन मुलेही दगावली. (Helicopter crash)
न्यू यॉर्क पोलिस आयुक्त जेसिका टिश म्हणाल्या की, कुटुंबांना या अपघातासंबंधी माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर पीडितांची ओळख जाहीर केली जाईल.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये उड्डाणानंतर हेलिकॉप्टर आकाशातून हेलकावे घेताना दिसते. या क्षणातच ते हडसन नदीत कोसळताना दिसत आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅनहॅटनच्या खालच्या बाजूला असलेल्या डाउनटाउन स्कायपोर्टवरून हेलिकॉप्टरने उड्डाण केले. न्यू जर्सीच्या किनाऱ्यावरून जाताना वळल्यानंतर लगेचच हेलिकॉप्टरचे नियंत्रण सुटले आणि ते जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजजवळ नदीत कोसळले. (Helicopter crash)
न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये हे सर्वजण होते. घटनेची चौकशी सुरू आहे. या कुटुंबीयांच्य दु:खात आम्ही सहभागी आहोत, असे ते म्हणाले.
एस्कोबार कुटुंबीय मूळचे स्पॅनिश आहे. ते बार्सिलोनामध्ये राहत होते. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी ही घटना अत्यंत वेदनादायी असे म्हटले आहे. या कुटुंबांनी प्रति त्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. (Helicopter crash)
हेही वाचा :
मुंबई हल्ल्यातील पाकच्या सहभागाची गुपिते उघडणार