Heavy rain hits Belgaum: बेळगावात अनेक घरांत पाणी

Heavy rain hits Belgaum

बेळगाव : प्रतिनिधी : बेळगावात मंगळवारी (२४ जून) सकाळपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागातील घरे आणि दुकानात पाणी शिरले. शहरातील क्लब रोडला तर नदीचे  स्वरूप प्राप्त झाले आहे. वैभवनगरमधील नाल्याची साफसफाई केली नसल्यामुळे अनेक घरांत पाणी शिरले. (Heavy rain hits Belgaum)

शहरातील अनेक भागांत पाणी मोठ्या प्रमाणावर साचून राहिले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचे चित्र सर्वत्र दिसून आले. मुसळधार पावसामुळे बुधवारी (२५ जून) बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शाळा, कॉलेजिसना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. (Heavy rain hits Belgaum)

बेळगाव शहर आणि परिसरात  पावसाने जोर धरला आहे. सतत पाऊस सुरु असल्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. सोसाट्याचा वारा आणि पाऊस यामुळे वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. पावसामुळे बाजारपेठेतील वर्दळही मंदावली आहे. वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. हेडपोस्ट ऑफिस जवळ झाड पडल्यामुळे त्या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. झाडे हटवण्याचे काम अनेक ठिकाणी सुरू होते. गटर्स आणि नालेसफाई केली नसल्याने शहरात अनेक ठिकाणी गटारी भरून पाणी रस्त्यावरून वाहत आहे. (Heavy rain hits Belgaum) दरम्यान, संततधारेमुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

हेही वाचा :
धरणक्षेत्रात अतिवृष्टी, पंचगंगा पात्राबाहेर

Related posts

एनसीडीसी ने सात साखर कारखान्यांना कर्ज नाकारले

‘निसर्गदूत – प्राचार्य  डॉ.मधुकर बाचूळकर  –चोळेकर’ या पुस्तकाचे प्रकाशन

बर्फाची चादर हरवली, हिमालयातील अर्थव्यवस्था ढासळली