गुजरात टायटन्स संघाच्या बसला लागली आग

Gujarat Titans team bus catches fire

अहमदाबाद : आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभूत झालेला गुजरात टायटन्सच्या संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली. सर्व खेळाडू आणि स्टाफला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने ते बचावले. त्यानंतर दुसऱ्या बसने त्यांना हॉटेलमध्ये पोहोचवण्यात आले. आगीची घटना रविवारी मध्यरात्री घडली. Gujarat Titans team bus catches fire)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंज बेंगळूर या संघामध्ये झाला. या सामन्यात बेंगळुरुने गुजरातचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल क्रिकेट स्पर्धा जिंकली. अंतिम सामन्यात बक्षिस वितरणाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम संपवून गुजरात टायटन्स संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बसने हॉटेलकडे जात असताना शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागली. सर्व खेळाडूंना सुरक्षितपणे बाहेर काढले. अचानक बसला आग लागल्याने खेळाडू एक तास अडकून पडले होते. त्यानंतर नवीन बसची सोय करण्यात आली. त्या बसने गुजरात टायटन्स् चे खेळाडू हॉटेलवर पोहोचले. (Gujarat Titans team bus catches fire)

Related posts

पोलिसांच्या ‘वसुली’मुळे महाराष्ट्र बरबाद; राजू शेट्टींची फडणवीसांवर टीका

प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी, प्रशांत परिचारक यांना धक्का

आरसीबीचे सलग दुसरे `विराट` विजेतेपद