गोकुळचे लोणी पूर्व युरोपमध्ये निर्यात

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सह. दूध उत्‍पादक संघ गोकुळ उत्पादित गायीच्या दुधाचे देशी लोणी (बटर) पूर्व युरोप व पश्चिम आशिया सीमेवरील अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास निर्यात करण्यात येणार असून गोकुळने केलेली ही पहिलीच थेट निर्यात आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर (दि.३) ४२ मेट्रिक टनाचे वातानुकूलित कंटेनर अझरबैजान देशाला पाठविण्‍यात आले. वातानुकूलित कंटेनरचे पुजन व निर्यात शुभारंभ संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे हस्‍ते झाले. यावेळी संचालक मंडळ उपस्थित होते. (Gokul News)

पश्चिम आशियातील व पूर्व युरोपातील अझरबैजान देशातील बाकू या प्रदेशातील अटेना दूध संघ गोकुळकडून गाय तूप, लोणी आणि दूध भुकटी यांची आयात करून ते रशिया, अझरबैजान, कजाकिस्तान, इराण सह अशा वीस देशांमध्ये विक्री करणार आहेत. यामुळे गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ आशिया व युरोपातील देशामध्ये उपलब्ध होणार आहेत.

यावेळी बोलताना संघाचे अध्यक्ष डोंगळे म्हणाले, गोकुळ ब्रॅण्‍डची उत्‍पादने नेहमीच गुणवत्तापूर्ण असल्‍याने दुग्ध पदार्थांची विक्री वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. अतिरिक्त गाय दुधाची निर्गत होणेसाठी गाय दुधाचे पदार्थ निर्यात करणे बाबत संघामार्फत प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून अझरबैजान या देशांमधील मे. अटेना डेअरी यांनी संघाचे गाय देशी लोणी (बटर) खरेदी केली असून घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर ४२ मेट्रीक टनाचे कंटेनर पाठवण्यात आले. अटेना ग्रूप यांनी संघाकडून आणखी लोणी, दूध भुकटी व तूप खरेदी करण्यामध्ये स्वारस्य दाखवले असून त्यांना संघाचे दुग्ध पदार्थ निर्यात करण्यात येतील. (Gokul News)

यावेळी संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, मार्केटींग व्यवस्थापक हणमंत पाटील, उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा :

Related posts

माजी फुटबॉलपटूची गळफास लावून आत्महत्या

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली