Free shuttle Bus: कोल्हापुरात विमानतळापर्यंत मोफत बस सेवा

Free shuttle Bus

Free shuttle Bus

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापुरात आता विमान प्रवाशांना वातानूकुलित बसमधून मोफत प्रवास घडणार आहे. खासदार शाहू छत्रपती यांच्यावतीने या उपक्रमाची आज मंगळवारी सुरुवात झाली आहे. उजळाईवाडी विमानतळ ते सयाजी हॉटेल, सयाजी हॉटेल ते उजळाईवाडी विमानतळ या मार्गावर ही बस धावणार आहे.( Free shuttle Bus)

कोल्हापूर शहरातून उजळाईवाडी विमानतळाचे अंतर सात ते आठ किलोमीटर आहे. पण विमानतळावर जाण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सीने जाण्याचा खर्च जास्त असल्याने प्रवाशांना मोठा भुर्दंड बसत होता. या मार्गावर वातानूकुलिन बस सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या केएमटी प्रशासनाला बस सेवा सुरू करण्यासाठी पत्र दिले होते. पण महानगरपालिकेने इलेक्ट्रिक बस वाहतूक सुरू झाल्यावर विमानतळासाठी बसची सोय करणार असल्याचे सांगितले.(Free shuttle Bus)

केएमटीची इलेक्ट्रिक बस वाहतूक सुरू होण्यास काही कालावधी लागणार असल्याने खासदार शाहू छत्रपतींनी मोफत बस सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी स्वखर्चाने मोफत बस उपलब्ध करुन दिली आहे. सध्या कोल्हापूरात तिरुपती, बेंगलोर, हैद्राबादकडे जाणारी विमानसेवा नियमित आहे. या प्रवाशांसाठी ही मोफत बस सेवा सुरू राहणार आहे. विमान सुटण्यापूर्वी अर्धा ते पाऊन तासापूर्वी हॉटेल सयाजी येथून ही बस सुटणार आहे. तसेच विमानातून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावरून सयाजी हॉटेलपर्यंत सोडण्यात येणार आहे. आज मंगळवारी सकाळी कोल्हापूर विमानतळ संचालक अनिल शिंदे आणि विमानतळ सल्लागार उद्योगपती तेज घाटगे यांच्या हस्ते मोफत बस सेवेचा शुभारंभ झाला. आजपासून ही सेवा अखंडीतपणे सुरू राहणार असल्याचे तेज घाटगे यांनी सांगितले. या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनिल शिंदे यांनी केले.

हेही वाचा :
देवेंद्र फडणवीस मोदींचे वारसदार ठरतील ?
कोल्हापुरात ‘आयटीहब’ उभारण्याचा मार्ग मोकळा


Related posts

Shivaji enter semi final

Shivaji enter semi final : शिवाजी तरुण मंडळ उपांत्य फेरीत

Luxury Goods

Luxury Goods : महागड्या वस्तू घेताय?… १% टीसीएस लागू

UPSC result

UPSC result : मेंढरं चारत असतानाच बिरदेवला फोन आला…