विधानसभा अध्यक्ष निवडीची औपचारिकता बाकी

मुंबई : विशेष प्रतिनिधी; नव्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. रविवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. सोमवारी त्याची अधिकृतपणे घोषणा केली जाईल. अल्पमतात असलेल्या महाविकास आघाडीकडून कोणीही उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. (Rahul Narvekar)

विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. सत्तारूढ महायुतीकडून नार्वेकर यांनाच पुन्हा या पदासाठी संधी देण्यात आली आहे. सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी आपला अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

सत्तारूढ महायुतीचे तब्बल २३६ आमदार आहेत. विरोधी महाविकास आघाडीचे केवळ ४९ सदस्य असल्याने ही निवडणूक एकतर्फीच होणार आहे. नार्वेकर कुलाबा विधानसभा मतदारसंघातून ते भाजपकडून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ