सध्या माणसाची धावपळ ज्यादा होत आहे. त्यामुळे दैनंदीन जीवनात खाण्यापिण्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. चुकीचा आहार व जीवशैली यामुळे नागरीकांत फॅटी लिव्हरची समस्या जाणवत आहे. यकृताच्या पेशींमध्ये जास्त प्रमाणात चरबी जमा झाल्यास हा आजार होतो. भूक न लागणे, थकवा येणे, यकृताला सूज येणे यावर वेळीच उपचार न केल्यास लिव्हर सिरोसिस, यकृत खराब होणे आणि यकृताचा कर्करोग असा धोका वाढू शकतो. यावेळी या आजारावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. फॅटी लिव्हरमुळे शरीरात खालील प्रकारची लक्षणे दिसतात.
- थकवा येणे
- पोटात दुखणे व दाह होणे
- भूक न लागणे
- वजन कमी होणे
- शारीरीक कमजोरी वाढणे
- डोळ्यांची हालचाल वाढणे
- लक्ष विचलीत होणे
- त्वचा व डोळे पिवळे पडणे
- पायात सूज येणे
- त्वचेला खाज येणे व अलर्जी उद्भवणे
फॅटी लिव्हरमुळे यकृत व्यवस्थित कार्य करत नाही, तेव्हा शरीरात द्रवपदार्थांचे असंतुलन होते. त्यामुळे चेहऱ्यावर सूज येते. चेहरा पिवळसर पडणे हे फॅटी लिव्हरचे लक्षण असू शकते. यकृत योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा शरीरात बिलीरुबिनची पातळी वाढते. त्यामुळे डोळ्यात व चेहऱ्यावर पिवळसरपणा वाढतो. चेहऱ्यावर लाल रेषा आणि पुरळ दिसणे हे देखील फॅटी लिव्हरचे लक्षण आहे. शरीरात पित्ताची पातळी वाढून त्वचा कोरडी पडते त्वचेला खाज सुटते. अशी लक्षणे दिसत असल्यास याबाबत वैद्यकीय तज्ञांचा तत्काळ सल्ला घेणे गरजेचे आहे.
यकृताच्या आजारावर नियंत्रण ठेवता येते
यकृताचे अनेक आजार बरे होतात. आहार आणि जीवनशैलीतील बदल करणे यासाठी सर्वात महत्वाचे आहे. नॉन-अल्कोहोल संबंधित फॅटी लिव्हर रोगापासून मुक्त होऊ शकतात. इतर प्रकारचे यकृत रोग बरे होऊ शकत नाहीत, मात्र ते ओषधांनी नियंत्रणात आणता येतात.