प्रसिद्ध दिग्दर्शक शाम बेनेगल यांचे निधन

मुंबई; प्रतिनिधी : समांतर चित्रपटाचे जनक, प्रसिध्द दिग्दर्शक शाम बेनेगल यांचे निधन झाले. गेले काही दिवस आजारी होते. आज (दि.२३) वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची कन्या पिया बेनेगल यांनी शाम बेनेगल यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (Sham Benegal)

बेनेगल हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते. १४ डिसेंबर रोजी त्यांनी ९० वा वाढदिवस साजरा केला होता. अभिनेता नसरुद्दीन शहा, दिव्या दत्ता, शबाना आझमी, कुलभूषण खरबंदा, रजत कपूर यांच्यासह नामवंत कलाकार त्यांच्या वाढदिवसाला हजर होते.

शाम बेनेगल हे समांतर चित्रपटाचे ते प्रणेते होते. त्यांच्या चित्रपटातील योगदानाबद्दल १९७६ मध्ये पद्मश्री, १९९१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांना २००५ मध्ये  भारतीय सिनेमातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होतो. पाचवेळा राष्ट्रीय पुरस्कार चित्रपद दिग्दर्शन मिळवणारे ते एकमेव होते. दुरदर्शनवर त्यांची ‘भारत एक खोज’ आणि ‘यात्रा’ या सिरियलला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. त्यांच्या अंकुर, निशांत, मंथन, भूमिका, मंडी, कलियुग, जुनून, सूरज का सातवा घोडा, मम्मो, सरदारी बेगम, जुबेदा, नेताजी सुभाषचंद्र बोस या चित्रपटांना सिनेरसिकांनी दाद दिली होती.    (Sham Benegal)

हेही वाचा :

Related posts

महसूल मंत्री बावनकुळेंना रामटेक; धनंजय मुंडेंना सातपुडा तर राम शिंदेंचे ज्ञानेश्वरीत असणार वास्तव्य!

मुख्यमंत्र्यांचा बंडाच्या पवित्र्यातील भुजबळांना सबुरीचा सल्ला

pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला