कोल्हापूरवरचा गद्दारीचा डाग पुसण्यासाठी राजू लाटकर यांना निवडून द्या – सतेज पाटील

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर ही छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी नगरी आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहरावर विरोधी उमेदवारामुळे गद्दारीचा डाग लागला आहे. सुरत गुवाहाटी मार्गे पळून जाणाऱ्या या गद्दारांमुळे अत्यंत दुर्दैवी इतिहास महाराष्ट्रात घडला. हा इतिहास बदलायचा असेल व कोल्हापूर शहरावर पडलेला गद्दारीचा डाग पुसायचा असेल तर येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला सामान्य कार्यकर्ता राजेश लाटकर यांना निवडून द्यावे लागेल असे मनोगत आ.सतेज पाटील यांनी व्यक्त केले. (Satej Patil)

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ उत्तरेश्वर पेठ येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला संजय पवार, आर.के.पोवार, रवीकिरण इंगवले, सचिन चव्हाण, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, सरलाताई पाटील, पद्मजा तिवले हे प्रमुख उपस्थित होते.

खासदार शाहू छत्रपती म्हणाले,  राजू लाटकर हे तळागाळातील कार्यकर्ते असून त्यांना  परिस्थितीची जाण असून ते जनतेचे हिताची कामे करतील असे खा.श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले. दीड हजार रुपये देऊन सरकारने अडीच हजार रुपये काढून घेतले असे चुकीचे धोरण राबवणारे या सरकारला सत्तेतून घालवले पाहिजे. (Satej Patil)

जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले लाटकर यांच्या नावामध्येच लाट आहे, जनतेच्या पाठबळावर ही लाट विरोधकांना उध्वस्त करून टाकेल. हिंदुत्व च्या नावाखाली खोटा प्रचार करणाऱ्या विरोधी उमेदवाराने भगव्याचा अपमान केला व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची फसवणूक केली. ही गद्दार प्रवृत्ती गाडण्यासाठी जनतेने राजेश लाटकर यांना मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. सभेला डी.जी.भास्कर, जयसिंगराव रायकर, रमेश पवार, अनिल माने, संभाजीराव जगदाळे, गिरीश कदम, शिरीष कदम, निरंजन कदम, प्रताप जाधव, सुजय पोतदार, श्रीधर गाडगीळ, सुरेश कदम, किशोर माने, रमाकांत आयरेकर, किरण पवार, जयसिंगराव साळोखे, दत्तात्रय मांडेकर, मदन भोसले, बंडोपंत सुतार, सर्जेराव टोपकर, प्रताप सुर्वे, पांडुरंग जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी