मंत्र्यांच्या नातलगाच्या घरावर ईडीचा छापा

ED raids the home of a minister's relative

बेळगाव : प्रतिनिधी : बेळगावचे अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त वाय मंजुनाथ यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून बेहिशोबी मालमत्तेची चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या भगिनींचे ते पती आहेत. मंजुनाथ हे गेल्या अनेक वर्षांपासून बेळगावात ठाण मांडून आहेत. ईडीच्या धाडीबाबत मंत्री सतीश जारकीहोळी यांना पत्रकारांनी धाडीबाबत विचारले असता त्यांनी आपल्याला त्याबाबत माहिती नाही असे सांगितले. (ED raids the home of a minister’s relative)

     बेळगाव, म्हैसूर, बंगळूर आणि आरसिकेरे यासह सहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले आणि अनेक ठिकाणी वाय. मंजुनाथ यांच्याशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंजुनाथ यांच्या म्हैसूरमधील एका मित्राच्या घरावर, बंगळूरमधील एका अपार्टमेंटवर, हसन जिल्ह्यातील आरसिकेरे येथील एका जवळच्या मित्राच्या घरावर आणि अथणी तालुक्यातील ऐनापूर गावातील एका मित्राच्या घरावरही छापे टाकले आहेत.बेल्लारीचे माजी खासदार देवेंद्रप्पा यांचे पुत्र वाय मंजुनाथ यांच्यावर बेनामीच्या नावाखाली जमीन, बार आणि रेस्टॉरंटच्या माध्यमातून अवैध मालमत्ता मिळवल्याचा आरोप आहे.वाय मंजुनाथ यांच्या सध्या बंगळूरमधील एका अपार्टमेंटमधील निवासस्थानीही कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. (ED raids the home of a minister’s relative)

Related posts

ज्ञानेश कुमारांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा जंतरमंतरवर जाणार :  अभिजीत दिपकें

उपमुख्यमंत्रीचे पुत्र म्हणून पार्थ पवाराना वेगळा न्याय मिळतोय का?

प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या २०० खेळाडूंचा होणार गौरव