गुजरात : कच्छमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गुजरातच्या कच्छमध्ये आज (दि.१) सकाळी १०.२४ वाजता ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यात कोणतेही  नुकसान झालेले नाही. इन्स्टिट्यूट ऑफ अर्थक्वेक रिसर्च (ISR) ने दिलेल्या माहितीनुसार सकाळी १०.२४ वाजता भूकंप झाला. त्याचे केंद्र भचौच्या उत्तर-ईशान्येस 23 किलोमीटर अंतरावर होते.

गेल्या महिन्यात ३ पेक्षा अधिक तीव्रतेचे भूकंप

गेल्या महिन्यात ३ पेक्षा अधितक तीव्रतेच्या चार भूकंपांची नोंद करण्यात आली होती. यात तीन दिवसांपूर्वी ३.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता. ज्याचा केंद्रबिंदू भचौजवळही होता. तर, २३ डिसेंबरला ३.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. ७ डिसेंबरला ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. १८ नोव्हेंबरला कच्छमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप झाला होता. तर, १५ नोव्हेंबरला उत्तर गुजरातमधील पाटणमध्ये ४.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता.

महाराष्ट्र दिनमान :

Related posts

Helicopter crash: कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा मृत्यू

Newzealand Win : न्यूझीलंडची विजयी सलामी

Modi and Jill मोदींचा हिरा आणि मनमोहन सिंगांची पुस्तकं