Drama Competition : बेचव (आंधळी) कोशिंबीर : ‘टेक इट लाईटली’

प्रा. प्रशांत नागावकर : 

 या स्पर्धेत रा. छ. शाहू महाराज महाविद्यालय कोल्हापूर यांनी प्रसन्न कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित ‘टेक इट लाईटली’ हे नाटक सादर केले.

प्रसन्नजी कुलकर्णी मराठी हौशी रंगभूमीवरील एक दिग्गज रंगकर्मी. लेखक आणि दिग्दर्शक म्हणून आपले कर्तृत्व यापूर्वी आपल्या रंगकार्यातून वेळोवेळी सिद्ध केले आहे. टी. एफ. टी. या संस्थेच्या माध्यमातून अनेक नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. विशेषः पीटर शेफरची काही नाटके त्यांनी अनुवादित केली आहेत. यामध्ये ‘ऐतश’ या नाटकाचा समावेश आहे. याबरोबरच ‘सेक्स ‘, ‘वेड्या कुंभाराच काय झालं?’ अशा नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. मध्यंतरी नाटकापासून दूर झाले होते. या स्पर्धेत मात्र त्यांनी हजेरी लावली. तीही एकदा नव्हे तर दोन वेळेस. या स्पर्धेत सादर झालेले ‘पद्मश्री धुंडीराज ‘ नाटकाचे दिग्दर्शन केले होते. तर या बॅनर खाली त्यांनीच लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले ‘टेक इट लाईटली’ सादर झाले. प्रसन्नजी कुलकर्णी यांच्याकडून खूपशा अपेक्षा उंचावल्या होत्या पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. कोल्हापूरच्या या दिग्गज रंगकर्मीने मात्र पूर्ण निराशा केली. त्यांच्याच नाटकाच्या शीर्षकाप्रमाणे प्रेक्षकांनीही हे नाटक अत्यंत ‘लाईटली’च घेतले. (Drama Competition)

एका हौशी कलावंताच्या काही कलाकृती एक जहागीरदार विकत घेण्यासाठी येणार असतात. त्याच वेळेला त्याच्या सध्याच्या गर्लफ्रिंडचे वडील लग्नाची बोलणी करण्यासाठी, त्याचे घर बघण्यासाठी येणार असतात. पण घरात बसण्यासाठी कोणतेच फर्निचर नसल्याने आपल्या मित्राच्या घरातील काही फर्निचर तो बाहेर गावी गेला असल्याने त्याला न सांगता घेऊन येतो. गर्लफ्रेंडचे वडील येण्यापूर्वीच घरातील लाइट्स जातात. अशावेळी ज्याचे फर्निचर आणले असते तो मित्रही येतो. मागावून त्याची जुनी गर्लफ्रेंडही येते आणि गोंधळाला सुरुवात होते. अशावेळी मित्राला त्याचे आणलेले फर्निचर दिसू नये म्हणून अंधाराचा फायदा घेऊन ते पुन्हा त्याच्या घरी नेऊन ठेवण्याची धडपड करत राहतो. त्यातून विनोद निर्माण होतो. पण नाटकातील गोंधळ आणि त्यातून निर्माण झालेला विनोद पूर्ण प्रभावाने पोहचवण्यात कलाकार पूर्णपणे अयशस्वी झालेत. दस्तुरखुद्द दिग्दर्शक विनोद पोहचवण्यात सर्वच पातळ्यांवर निष्प्रभ ठरलेत.  त्यांच्या म्हणण्यानुसार “हा एक प्रयोग आहे. जगण्यातला फार्स आहे. अंधारातला रंगबाज तमाशाचा खेळ उजेडात साळसूदपणा आणून, मुखवट्यांच्या खेळाचं अंगवळणी नाटक ब्लॅक कॉमेडी अंधारातलं. इथे बहुरूपे अंधारात उजेडाचा उजेड पाडतील. नि उजेडात आंधळ्या कोशिंबिरीचा रंगबाज खेळ खेळतील. सो, टेक इट लाईट ली!”

दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार जगण्यातला फार्स जो काही आहे, तो प्रेक्षकांपुढे पोहचलाच नाही. त्यातल्या फार्सपेक्षा कलाकारांच्या मधला उथळपणाच जास्त पोहचला. आणि रंगमंचावर दिग्दर्शकाने ‘अंधाराचा उजेड’ पाडल्यामुळे नाटकातील ते म्हणतात तशी ‘ब्लॅक कॉमेडी’ दिसलीच नाही. (Drama Competition)

कलाकारांनी अभिनयाच्या पातळीवर प्रचंड निराशा केली आहे. हे मान्य आहे की, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभिनय कसा करावा याचे ज्ञान नसेल पण दिग्दर्शकांनी त्यांच्याकडून करून घेणे अपेक्षित होते. याचा अर्थ दिग्दर्शक इथेही कमीच पडला.  अभिनयाबरोबर तांत्रिक पातळीवरही निराशाच होती.  एकूणच लेखक आणि दिग्दर्शक म्हणून प्रसन्नजी कुलकर्णी यांनी निर्माण केलेली आंधळी कोशिंबीर बेचव ठरली.

तंत्रज्ञ परिचय

  • दिग्दर्शक सहाय्यक : मृणाली मोगल
  • नेपथ्य  सहाय्यक : ओम चौरे
  • संगीत योजना :  ऋषिकेश जोशी, अर्चित रुकडे
  • प्रकाश योजना : कपिल मुळे
  • रंगमंच सहाय्यक : गोपाल चौधरी
  • वेशभूषा डी. हेमांगी
  • रंगभूषा :  बाशिकांत
  • प्रशासकीय सहाय्यक : प्रदिप दशेळके, शिधर अनमे
  • निर्मिती प्रमुख : Dr. परितकर
  • विशेष सहाय्यक : निकीता दोशी
  • सहनिर्मिता : Dr. शिशिर मिरगुंडे
  • निर्मिता : सत्यवान सोने

पात्र परिचय

  • बिंदा : रोहित कल्यानकर
  • किट्टु : गोरी जाधव
  • बशकुंतला : ऋतुजा रुपवते
  • कर्नल : हर्ष त्रिभुवन
  • हरिहरन : गितेश कुल्हाने
  • धोखडे : गोपाल चौधरी
  • करिष्मा : पलक पाटनी
  • जहागिरदार : ओम चौरे

हेही वाचा :

Related posts

अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

Pushpa २ ला कन्नडमध्ये “UI” कडून धोबीपछाड