Drama Competition 2024 : वैचारिक संघर्षातील बोथटपणा

– प्रा. प्रशांत नागावकर

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात टोकाचे मतभेद असले तरी दोघांचे ध्येय एकच होते. पण त्या ध्येयाकडे जाणाऱ्या वाटा मात्र निराळ्या होत्या. हे वास्तव असेल तर गांधी आणि आंबेडकर एकमेकांना पूरक आहेत की विरोधी? ते विरोधक असतील तर का? दोघांतील समान दुवा काय आहे?  गांधीजी देशाच्या स्वातंत्र्याबद्दल बोलत होते आणि आंबेडकरांना जातीव्यवस्थेपासून मुक्त असे स्वातंत्र्य हवे होते. गांधी-आंबेडकर वाद अस्पृश्यतेच्या मुद्द्यावरून सुरू झाला. त्यावेळी गांधी हे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा काँग्रेसवरही प्रभाव होता. सामाजिक-राजकीय निर्णय घेण्याची प्रक्रिया गांधींच्या सल्ल्यानुसार चालत होती. तथापि, आंबेडकरांचे असे मत होते की गांधींनी अस्पृश्यतेच्या संदर्भात हा परिणाम दाखवला नाही. अस्पृश्यतेच्या मुद्द्यावर गांधी आणि आंबेडकर यांच्यात मतभेद होते. कारण त्यांचे अनुभव भिन्न आहेत. गांधीजींचा जन्म अनुकूल वातावरणात झाला. ते अस्पृश्यतेकडे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहत असल्याने अस्पृश्यता पाप मानत होते. उलट आंबेडकरांना जातीपातीच्या आणि अपमानाच्या असह्य वेदना सहन कराव्या लागल्या. त्यामुळे अस्पृश्यता हा गुन्हा आहे, असे त्यांचे स्पष्ट मत होते.  (Drama Competition 2024)

बाबासाहेबांना गोलमेज परिषदेत अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ते गांधीजींसाठी चिंतेचे होते. कारण ते दलितांसाठी वर्षानुवर्षे काम करत होते, पण आता केंद्रस्थानी आले आहेत आंबेडकर! त्यामुळे गोलमेज परिषदेला जाण्यापूर्वी गांधींनी आंबेडकरांना निमंत्रित केले. १९३२ साली मुंबईतील मणिभवन येथे ही बैठक निश्चित करण्यात आली होती.

या भेटीतून काहीतरी सकारात्मक निष्पन्न होईल, अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती. दोघेही वक्तशीर होते. योजनेनुसार आंबेडकर वेळेवर तेथे पोहोचले, पण गांधींनी आंबेडकरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. बराच वेळ हे शांततेत चालू होते. शेवटी बाबासाहेब उठले आणि म्हणाले, ‘मि. गांधीजी, माझी मातृभूमी कुठे आहे?’… गांधीजी अवाक् झाले.  आंबेडकरांना ब्राह्मण मानण्यात गांधींची चूक होती. गांधींना आंबेडकरांची जात माहीत नव्हती. ते आंबेडकरांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकले नाहीत आणि आंबेडकर निघून गेल्यावरही ते अवाक्च राहिले. (Drama Competition)

१९३३ साली गांधींनी पुण्यातील येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले आणि सगळीकडे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. आंबेडकरांवरील दबाव वाढला. त्यांच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष वेधले गेले. आंबेडकर म्हणाले, ‘मी चर्चेसाठी तयार आहे. डॉ. बाबासाहेब गांधींना भेटण्यासाठी येरवडा तुरुंगात गेले. गांधींना पाहताच बाबासाहेबांची आक्रमकता ओसरली. ते गांधींच्या पलंगाच्या जवळ बसले आणि शांत स्वरात त्यांची भूमिका विशद केली. तुम्ही आमच्यावर अन्याय करत आहात,’ असेही त्यांनी निश्चितपणे सांगितले. यावर ‘तुम्हाला माझी सर्व सहानुभूती आहे. डॉक्टर, तुम्ही जे बोलताय त्यात मी तुमच्या पाठीशी आहे. आंबेडकर तुम्ही जन्माने अस्पृश्य आहात आणि मी उत्स्फूर्तपणे. आपण सर्व एक आणि अविभाज्य होऊ या. जर तुम्हाला मला जिवंत ठेवायचे असेल तर विचार करा.’ यानंतर पुणे करार झाला. स्वतंत्र मतदारसंघांऐवजी राखीव जागांच्या प्रस्तावावर एकमत झाले. खरे तर, पुणे करारापूर्वी गांधींना बाबासाहेबांबद्दल पुरेशी माहिती नव्हती किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना आंबेडकरांबद्दल पुरेसे ज्ञान दिले नव्हते. गांधीजींच्या उपोषणाच्या काळातच गांधी आणि आंबेडकर यांच्यात चर्चेची प्रक्रिया सुरू झाली. हे आधी घडले असते तर कदाचित गांधी-आंबेडकर संबंधात कटुता आली नसती. (Drama Competition 2024)

हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे  ‘गांधी नीतीचे २१ दिवस’ हे नाटक. दिग्दर्शकाने नाटकातील कोणत्याही प्रसंगांना खऱ्या अर्थाने न्याय दिला नाही. दोन महापुरुषांच्या वैचारिक संघर्षावर आधारित नाटक उभे करण्यासाठी जी क्षमता लागते, जी ताकद लागते त्यामध्ये दिग्दर्शक पूर्णपणे कमी पडला आहे. संहिते नुसार ज्या पद्धतीने नाटक उभे राहायला हवे होते तसे ते उभारले नाही.

दिग्दर्शनाबरोबरच  कलावंतांनी अत्यंत नीरसपणे उभे केलेले हे नाटक प्रेक्षकांना भावले नाही. संहितेच्या माध्यमातून हाताळलेल्या संवेदनशील विषयाचे दडपण कलाकार चोखंदळ नाट्य रसिकांपासून लपू शकले नाहीत. असे असले तरी, एक संवेदनशील विषय हाताळल्याबद्दल मनापासून अभिनंदन.

‘गांधी आणि आंबेडकर’ यांच्या विषयी राज्यभरातील प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. खरेतर दोघांतील संघर्षशील आणि तितकाच संवेदनशील विषय हाताळणे तितकेसे सोपे नाही. यामुळे एक स्वाभाविक दडपण आणि अनाहूत भीती हे नाटक सादर करताना आल्याची प्रचिती या वेळीही आली. अनंत कांबळे मांडुकलीकर दिग्दर्शित या नाटकात म. गांधी यांची भूमिका वैभव घाटगे यांनी, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका संभाजी कांबळे यांनी साकारली. (Drama Competition 2024)

दोघांनी अभिनयात कोणत्याही प्रकारची चमक दाखवतात दाखवली नाही. दोन महापुरुषांच्या व्यक्तिरेखा नीट उभारू शकले नाहीत. स्वत: दिग्दर्शक मांडुकलीकर यांनी लेखन, दिग्दर्शन आणि नेपथ्य या तिन्ही बाजूंची जबाबदारी अंगावर घेतली होती. पण तिन्हीही जबाबदाऱ्या त्यांना नीट पेलवता आल्या नाहीत. पार्श्वसंगीताची बाजूही प्रसंगाचा बेरंग करणारी होती. नाटकाला साजेसे नेपथ्य असले तरी प्रसंग नीट उभे राहिलेच नाहीत. ब्लॅक आऊट हा अनेक नाटकांच्या बाबतीत जसा चिंतेचा विषय झाला तसाच या नाटकाबाबतीतही ठरला.

या बाबी तांत्रिक पातळीवर निराशा करणाऱ्या ठरल्या तरी रंगभूषा व वेशभूषेची जबाबदारी सक्षम पार पडल्याचे प्रत्ययास आले.

नाटक खूपच नीरस पद्धतीने सादर झाले. कलाकारांचा आवाज प्रेक्षकांपर्यंत नीट पोचत नसल्यामुळे संघर्षाचे अनेक संवाद हरवून गेले. साहजिक दोन महापुरुषांच्या वैचारिक संघर्षाची धार बोथट झाल्याचे पाहायला मिळाले.

नाटक : गांधी नीतीचे २१ दिवस

लेखक, दिग्दर्शक, नेपथ्य : अनंत मांडुकलीकर

सादरकर्ते : हृदयस्पर्श सोशल ॲण्ड कल्चरल फौंडेशन, कोल्हापूर

संगीत : सचिन श्रावस्ती व श्री.के.

प्रकाश योजना : तन्मय राऊत

भूमिका आणि कलावंत

गांधीजी : वैभव घाटगे

डॉ. आंबेडकर : संभाजी कांबळे

शिवतरकर : सतीश कासे

एन. शिवराज : भास्कर पाटील

महादेवभाई : सतीश रांगोळे

प्यारेलाल : प्रकाश अंबवडेकर

हेही वाचा :

Related posts

अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली