मोदी यांना डॉमिनिकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

रुसाऊः उत्तर अमेरिका खंडातील देश डॉमिनिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च पुरस्काराची घोषणा केली आहे. देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार, ‘डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ मोदी यांना देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने आज दिली.  (Narendra Modi)

मोदी यांच्या आफ्रिका दौऱ्याच्या अगोदर या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. कोविड-१९ महामारीच्या काळात डॉमिनिकामध्ये त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल आणि भारत आणि डॉमिनिका यांच्यातील भागीदारी मजबूत करण्याच्या त्यांच्या समर्पणाला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. डॉमिनिका गयाना येथील इंडिया-कॅरिकॉम शिखर परिषदेत मोदी यांना त्यांचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान, ‘डॉमिनिका पुरस्कार ऑफ ऑनर’ प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

Related posts

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या

Python near Hostel: शंभर किलो अजगराचा गर्ल्स होस्टेलजवळ डेरा

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव