लाखो अनुयायांच्या उपस्थितीत धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

नागपूर : आज (दि.१२) दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला गेला. यंदाचा ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Din 2024) आहे. या निमित्ताने देश-विदेशातून लाखो अनुयायी नागपूर येथे दाखल झाले आहेत.

अनुयायांसाठी सोयी सुविधा

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमीत्ताने नागपूर येथे देश-विदेशातून लाखो लोक नागपूर येथे दाखल झाले. त्यांच्या सुविधेसाठी महानगरपालिका यांच्याकडून नियंत्रण कक्षाची उभारणी केली होती. हा नियंत्रण कक्ष साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ उभारण्यात आला. त्याचबरोबर दिक्षाभूमी मार्गावर मनपाचे एकुण चार आरोग्य तपासणी केंद्र, २४ तास रुग्णवाहिका, स्वच्छतेसाठी सफाई कर्मचारी, शुद्ध पाण्याची व्यवस्था, अग्निशामन दल, प्रकाश व्यवस्था, निवारा व्यवस्था, शौचालय व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, परिवहन व्यवस्था आदी सोयी सुविधा केल्या.

संविधानाला सर्वाधिक मागणी

दरवर्षीप्रमाणे दीक्षाभूमीवर यंदाही दोनशेहून अधिक पुस्तकांची दुकाने लावण्यात आली होती. या दुकानांत प्रामुख्याने फुले, कबीर, बुद्ध, आंबेडकर, पेरियार या महापुरुषांवर आधारित पुस्तके आहेत. काही पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले की, यंदाही संविधानाला वाचकांकडून सर्वाधिक मागणी आहे.

कधी पासून साजरा केला जातो धम्मचक्र प्रवर्तन दिन?

भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १२ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तेव्हापासून या दिवशी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Din) साजरा केला जातो. यंदाचा ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. या दिवशी आंबेडकर अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेतात. या दिवसाची आठवण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या स्मारकासमोर नतमस्तक होण्यासाठी यंदाही लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर आले आहेत.

हेही वाचा :

Related posts

नागपूरमध्ये महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न

लोकसंख्या वाढीचा भागवत यांचा सल्ला!

मला पाडण्याची  राणांची लायकी नाही