फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला. मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या शानदार शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली.  तब्बल चाळीस हजार नागरिक या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता होती. शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण दिले होते. या सोहळ्यासाठी दिग्गजांसाठी विशेष आसन व्यवस्था करण्यात आली होती. (Devendra Fadnavis Swearing-in )

पहिल्या रांगेतील आसन व्यवस्था

अंबानी कुटुंबीय, देवेंद्र फडणवीस यांचे कुटुंबीय, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अंबादास दानवे, निलम गोरहे, नारायण राणे, उदयनराजे भोसले, राम नाईक.

दुसऱ्या रांगेतील आसन व्यवस्था

मर्चंट कुटुंबीय, कुमार बिर्ला, अजय पिरामल, उदय कोटक, शाहरुख खान, सलमान खान, सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, दिलीप संघवी, अनिल अंबानी, रणबीर कपूर, रणवीर सिंह, गीतांजली किर्लोस्कर, बिरेंद्र सराफ, अनिल काकोडकर.

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ