उत्तर भारतात दाट धुक्याचा इशारा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशात थंडी आणि धुक्याचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. हवामान खात्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि बिहारमध्ये दाट धुक्याचा इशारा जारी केला आहे.

थंडीचा सर्वाधिक परिणाम राजस्थानमध्ये दिसून येत आहे. फतेहपूर, सिकरमध्ये मंगळवारी किमान तापमान ६.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले. भरतपूरमध्ये धुक्यामुळे दृश्यमानता ५० मीटरपेक्षा कमी राहिली; मात्र देशातील सर्वात कमी दृश्यमानता (शून्य मीटर) आग्रा येथे नोंदवण्यात आली. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार येत्या काही दिवसांत येथे धुके कायम राहणार आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशातही भोपाळ, ग्वाल्हेर, भिंड, मुरैना आणि दतियामध्ये दाट धुके दिसले. त्यामुळे दृश्यमानता खूपच कमी झाली. हवामान खात्याने म्हटले आहे, की बर्फवृष्टीमुळे मध्य प्रदेशात थंडी वाढली आहे.

श्रीनगर, जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरूच आहे. सोनमर्गमध्ये सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेली बर्फवृष्टी मंगळवारी सकाळीही सुरूच होती. त्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात तापमानात घट नोंदवण्यात आली. फतेहपूरमध्ये मंगळवारी सकाळी किमान तापमान ६.५ अंश होते. सोमवारी येथे ७.५ अंश किमान तापमानाची नोंद झाली. मंगळवारी सकाळी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे धुक्यामुळे दृश्यमानता शून्य मीटरवर राहिली. जम्मू-काश्मीरच्या सोनमर्गमध्ये मंगळवारी सकाळी बर्फवृष्टी झाली. येथे पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. कर्नाटकातील तंजावरमध्ये मुसळधार पाऊस झाला. तमिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सतत पाऊस पडत आहे. हवामान खात्याने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला होता. वेदारण्यम येथे सर्वाधिक १७.५ सेंटिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. त्यानंतर कोडियाकराईत १३.४ सेंटिमीटर पाऊस झाला. तिरुवरूरमध्येही जोरदार पाऊस झाला. थिरुथुराइपुंडी येथे अवघ्या दोन तासांत सात सेंटिमीटर पावसाची नोंद झाली. पट्टुकोट्टई क्लॉक टॉवर आणि बसस्थानकासह तंजावरमधील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले