परभणीत तरुणाचा मृत्यू

परभणी, प्रतिनिधी : परभणी येथे झालेल्या दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनात सूर्यवंशी याचा तुरुंगात मृत्यू झाला, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली. या घटनेने परभणी शहरात तणाव निर्माण झाला आहे.

दहा डिसेंबर रोजी परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. या घटनेनंतर परभणी बंदची हाक दिली होती. बंदच्यावेळी शहरात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करुन आंदोलकांना ताब्यात घेतले होते. आज रविवारी सकाळी ताब्यात घेतलेल्या आंदोलकापैकी सोमनाथ सूर्यवंशी याच्या छातीत कळ आल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. छत्रपती संभाजीनगरमध्ये शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

या घटनेचे वृत्त कळताच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. दरम्यान परभणी बंदचे आवाहनही काही संघटनांनी केले आहे.

हेही वाचा :

Related posts

hingoli health news: शस्त्रक्रियेनंतर ४३ महिलांना जमिनीवर झोपवले

धाराशिव : मोबाईल दुकान लुटणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

आई-बहिणीवरून शिव्या दिल्यास भोगा परिणाम