बुद्धीबळाच्या पटावरचा नवीन ‘राजा’

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : जागतिक बुद्धिबळ स्‍पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा दोम्‍माराजू गुकेशने जगज्जेता डिंग लिरेनचा पराभव करत इतिहास रचला. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्याने जागतिक बुद्धिबळ अजिंक्‍यपदाला गवसणी घातली. या कामगिरीसह तो विश्वविजेता बनणारा तो भारताचा दुसरा बुद्धिबळपटू ठरला. याआधी विश्वनाथन आनंदने ही कामगिरी पहिल्यांदा केली होती. (D Gukesh)

जागतिक बुद्धिबळ स्‍पर्धेची अंतिम फेरी अतितटीची झाली. सामना शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीने झाली. डिंग लिरेनकडे आज (दि.१२) पांढऱ्या सोंगट्या होत्या. त्याने डावाची सुरुवात N f3 या ओपनिंग या प्रकाराने केली. गुकेशने त्यास d5 या खेळीने उत्तर दिले. तेराव्या खेळी अखेर दोघांनी राजाच्या बाजूस आपले किल्ले कोट पूर्ण केले.

स्पर्धेचा अजिंक्‍यपदाचा सामना बुधवारी १३ वा डाव बरोबरीत सुटला होता. यावेळी गुकेश अणि डिंग लिरेन यांचे समान ६.५ गुण झाले होते. त्यामुळे अखेरचा पारंपरिक डाव झाला. डिंग हा पांढर्‍या मोहर्‍यांनी खेळणार असल्‍याचे त्‍याचे पारडे जड मानले जात होते. चौदाव्‍या डावात जो कोणी ७.५ गुणांची कमाई करणारा खेळाडू हा जागतिक बुद्धिबळ अजिंक्‍यपद पटकावतो.

गुकेशने ११ व्‍या डावात ६-५ अशी आघाडी घेतली होती. मात्र डिंग लिरेनने १२ व्‍या डावात बरोबरी साधण्‍यात यश मिळवले होते. जागतिक लढतीमध्‍ये १३ डावानंतरही गुणांची बरोबरी कायम राहिली. तेराव्‍या डावात ६९ चालींच्‍या प्रदीर्घ लढ्यानंतर दोघांनीही बरोबरी पत्‍करण्‍याचा निर्णय घेतला होता. या अजिंक्‍यपद स्‍पर्धेत १३ डावांपैकी ३२ वर्षीय डिंगने पहिला डाव जिंकला तर गुकेशने तिसरा डाव जिंकून बरोबरी साधली. दोन्‍ही ग्रँडमास्‍टर्सनी सलग सात डाव बरोबरीत सोडवले होते. ( D Gukesh)

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत