मतदानाचे शस्त्र वापरून क्रांती घडवा

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विकास म्हणजे केवळ पूल बांधणे नव्हे तर अकलेचाही विकास व्हावा लागतो. राज्यकर्ते जनतेला गृहीत धरत असून निवडणुकीनंतर फेकून देतात. त्यामुळे निवडणुकांमध्ये मतांचे शस्त्र तुमच्या हातात आहे. त्याचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करा आणि क्रांती घडवा, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी केले. (Raj Thackeray)

दसऱ्याच्या निमित्ताने त्यांनी प्रथमच पॉडकॉस्टद्वारे जनतेशी संवाद साधला. सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना यावेळी निवडणुकीत मनसेला मतदान करण्याचे आवाहन केले. राज ठाकरे यांनी शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटांवरही अप्रत्यक्ष टीका केली.

ते म्हणाले ही निवडणूक महत्वाची असून  तुम्ही  बेसावध राहू नका. तुम्ही बेसावध राहावे, म्हणून राजकीय पक्ष आपापले खेळ करून जातात. त्यामुळे पुढली पाच वर्षे तुम्हाला पश्चातापाशिवाय काही पर्याय राहत नाही. तुम्हाला गृहीत धरले जात आहे. तुमच्या मतांशी प्रतारणा केली जात आहे. त्यामुळे तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांना, मतांशी प्रतारणा करणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे. त्यामुळे क्रांती करा, वचपा काढा, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र साकारणाचे स्वप्न मी पाहिले आहे. त्यासाठी सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  (Raj Thackeray)

फक्त पूल बांधणे म्हणजे विकास नाही. विकास हा अकलेने व्हावा लागतो,  जगभरातले देश प्रगती पथावर आहेत. तर आपण अजूनही चाचपडत आहोत. याचा राग तुम्हाला येत नाही का? तुम्ही त्याच त्याच लोकांना निवडून देत आहात. मग पश्चातापाची वेळ येणारच, तुम्ही बेसावध राहता. त्यामुळे वेड्यावाकड्या युती, आघाड्या झाल्या. त्यातले काही जण आज बोलतील. एकमेकांची उणीधुणी काढतील. पण त्यात तुम्ही नसाल, असा टोलाही राज यांनी उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. ()

ऐन मोक्याच्या वेळी तुम्ही तुमचे शस्त्र मॅन करता. निवडणुकांमध्ये मतांचे शस्त्र तुमच्या हातात आहे.  त्याचा वापर मतदाना दिवशी करा. आता संधी आली आहे. तुम्ही आतापर्यंत सर्वांना संधी दिली आहे. आता एक संधी आम्हालाही द्या,  असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

आपण केवळ आपट्याची पाने लुटतोय..

राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचे सोने  गेली अनेक वर्ष लुटले जात आहे. आपण फक्त आपट्याची पाने एकमेकांना वाटतोय. आपल्या हातात आपट्याच्या पानाशिवाय काही राहिलेले नाही.  जातीपातीच्या राजकारणात आपण अडकलो आहोत. तुम्ही बेसावध राहाता. त्याचा फटका तुम्हाला पुढची पाच वर्षे बसतो. राजकीय पक्ष आपला खेळ करून जातात. प्रगती झाल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ