Counterattack on Modi: दलित सरसंघचालक कधी करणार?

Counterattack on Modi

नरेंद्र मोदी हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : विशेष प्रतिनिधी : संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यातील सलोख्याचे संबंध जगजाहीर आहेत. नेहरुंनी बाबासाहेबांना सन्मानाने देशाच्या पहिल्या कायदा मंत्रीपदाची जबाबदारी दिली. आज काँग्रेस पक्षाचा अध्यक्षही दलित समाजाचा आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक दलित, मुस्लिम किंवा महिला कधी करणार? असा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला.(Counterattack on Modi)

पंतप्रधान मोदी यांनी हिस्सारमध्ये बोलताना काँग्रेसला मुस्लिमांबद्दल एवढा कळवळा आहे तर पक्षाध्यक्ष मुस्लिम का केला नाही, असा सवाल केला. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत सपकाळ म्हणाले की, मोदींनी काँग्रेस पक्षाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत हास्यास्पद आहे. काँग्रेस पक्षाने देशासाठी दिलेले योगदान अधोरेखीत झालेले आहे, काँग्रेसला जाज्ज्वल्य इतिहास आहे. काँग्रेस सरकारच्या काळात साक्षरतेपासून अंतराळापर्यंत प्रगती केलेली आहे. नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून सत्तेत आहेत, या ११ वर्षांत त्यांनी देशाचे काय भले केले, हे त्यांनी जाहीर करावे. त्यांनी हिंदू-मुस्लिम, दलित-सवर्ण-ओबीसी यांच्यात द्वेष निर्माण करण्याचेच काम केले आहे. (Counterattack on Modi)

११ वर्षांत एक मुस्लिम उमेदवार का नाही?

तीन तलाक, वक्फ बोर्डसारखे मुद्दे उपस्थित करून मोदींनी मुस्लिम महिलांबद्दलची आपली खोटी तळमळ दाखवण्याचा प्रयत्न केला, पण मोदींनी गेल्या ११ वर्षांत एकाही मुस्लिम महिलेला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री केले नाही. मोदींनी गेल्या ११ वर्षात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळात मुस्लिम आणि दलितांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यांचे लिंचिंग केले जात आहे ते रोखण्यासाठी मोदींनी काहीही केले नाही त्यामुळे त्यांच्या कोरड्या भाषणबाजीला काही अर्थ नाही.

अमेरिकेच्या टेरिफवर बोला

देशात शेतकऱ्यांचा शेतमालाला भाव मिळत नाही, तरुणांना रोजगार मिळत नाही, देशातील बहुजन समाज अस्वस्थ आहे. या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे पण मोदी मात्र स्वतःची आरती करून घेत आहेत. कोरोना काळात टाळी, थाळी वाजवायला लावली आता अमेरिकेच्या टेरिफवर काय भूमिका आहे ते स्पष्ट करावे. देशातील गरिबांची संख्या मोदींच्या काळात वाढत आहे, श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, लाखोंच्या संख्येने लोक देश सोडून चालले आहेत हेच मोदींनी देशाचे भले केले आहे का? भाजपा सरकारच्या काळातच दलित अत्याचार वाढले आहेत, मॉब लिंचिग सारखे प्रकार दलितांबाबत झाले आहेत, ते थांबावे यासाठी मोदींनी काहीही प्रयत्न केले नाहीत. सातत्याने काँग्रेसवर टीका करणे हेच त्यांचे काम राहिले आहे. (Counterattack on Modi)

संघ विचाराकडूनच आंबेडकरांचा अवमान आंबेडकर यांच्याबद्दल भाजपा, रा. स्व. संघ यांना किती प्रेम आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही, याच विचाराच्या लोकांनी बाबासाहेबांचा सातत्याने अपमान केला. संघ आंबेडकर यांच्या संविधानाला पहिल्यापासूनच मानत नाही. रामलीला मैदानावर बाबासाहेबांचे संविधान कोणी जाळले, हे मोदींना माहित नाही का? परंतु खोटा इतिहास सांगून दिशाभूल करणे ही संघाची शिकवण आहे, तेच मोदी करत आहेत. पण त्यांच्या अशा विधानाने खरा इतिहास झाकला जाणार नाही. रा. स्व. संघ, भाजपा व मोदींनी केलेली पापे धुऊन निघणार नाहीत. प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीवर प्रेम असले पाहिजे हे संविधान सांगते, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही भारताची परंपरा आहे, तीच परंपरा काँग्रेसचीही आहे, असे सपकाळ म्हणाले.

हेही वाचा :
काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष का केला नाही?
आंबेडकरांच्या चळवळीत व्यक्तिमत्त्व पुनर्स्थापनेचा विचार

Related posts

Maharshi Shinde

Maharshi Shinde : महर्षी वि.रा. शिंदे क्रांतीकारी लोकोत्तर व्यक्तीमत्त्व

Atal Cup

Atal Cup : जुना बुधवार संघाची अंतिम फेरीत धडक

Mitra

Mitra : सांगली, कोल्हापुरातील पूर नियंत्रणासाठी साठवण तलाव बांधा