Congress-BJP: कौटुंबिक खासगीपणाचा आदर

Congress-BJP

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाच्या खासगीपणाचा आदर म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ नेते अस्थिविसर्जनावेळी उपस्थित राहिले नव्हते, असे प्रत्युत्तर काँग्रेसने भाजला दिले आहे. सिंग यांच्या अस्थिविसर्जनावेळी काँग्रेसचा कुणीही नेता उपस्थित नव्हता, अशी टीका भाजपने सुरू केली आहे. त्याला काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी उत्तर दिले. (Congress-BJP)

त्यांनी सांगितले की, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वद्रा यांनी अंत्यसंस्कारानंतर सिंग यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. कौटुंबिक खासगीपणाचा आम्ही आदर करतो. शोकग्रस्त कुटुंबाला तो मिळाला पाहिजे. अंत्यसंस्कारावेळीही सिंग यांचे काही नातेवाईक पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ‘फूल चुनाना’ विधीसाठी त्यांच्याशी चर्चा करूनच कुणीही नेता उपस्थित राहिला नाही. अस्थिविसर्जन हा कुटंबीयांच्यादृष्टीने भावनिक विषय असतो.(Congress-BJP)

डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावर निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी सकाळी यमुना नदीकिनारी गुरुद्वाराजवळ असलेल्या ‘अस्थ घाट’ येथे अस्थिविसर्जन करण्यात आले. यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर आणि त्यांच्या तीन मुली उपिंदर सिंग, दमन सिंग आणि अमृत सिंग यांच्यासह इतर नातेवाईक उपस्थित होते, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

डॉ. मनमोहन सिंग २००४ ते २०१४ पर्यंत पंतप्रधान होते. गेल्या तीन दशकांमध्ये भारताच्या वेगवान विकासाचा मार्ग मोकळा करणाऱ्या आर्थिक सुधारणांची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांना जाते.

 

हेही वाचा :

कर्मयोगी

मेणाहून मऊ, वज्राहून कठोर

 

Related posts

Beed sirpanch: डॉक्टरच्या माहितीवरून काढला घुले, सांगळेचा माग

भ्रष्टाचार बाहेर काढणा-या पत्रकाराची छत्तीसगडमध्ये हत्या

Delhi election: केजरीवाल विरोधात परवेश शर्मा