CM Bhajanlal : सीएम बोलले, माझा आवडता अभिनेता ‘नरेंद्र मोदी’

CM Bhajanlal

जयपूर : प्रतिनिधी :मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी विचारले तुमचा आवडता नट कोण? मुख्यमंत्री म्हणाले, नरेंद्र मोदी. त्यांच्या उत्तरावर आजबाजुचे लोक हसू लागले. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर काँग्रेसने मुख्यमंत्र्यांची चांगलीच खिल्ली उडवली. “देर से सही… भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी मोदी नेता नाहीत तर अभिनेता आहेत” अशा शब्दात खिल्ली उडवली. (CM Bhajanlal)

राजस्थानमधील जयपूर येथे एका संस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात चित्रपटाशी संबधित स्टार अभिनेते, अभिनेत्री उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल आणि उप मुख्यमंत्री दीया कुमारही उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांना ‘तुमचा फेव्हरिट अक्टर कोण आहे?’ यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी हसत हसत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले. त्यावर उपस्थित सर्वजण हसायला लागले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर भाजपवर डोटासराने जोरदार हल्ला चढवला. त्यांनी असे म्हटले आहे की, “देर से सही… भाजप सरकारचे मुख्यमंत्री म्हणून लागले की मोदी नेता नाहीत अभिनेता आहेत. कॅमेऱ्यासमोर कलाकारी, टेलिप्रॉम्टर, वेषभूषा आणि पल्लेदार भाषणात ते प्रसिद्ध आहेत”. (CM Bhajanlal)

माजी मंत्री खाचरियावास यांची टीका

जयपूरमधील या कार्यक्रमावर गहलोत सरकारमधील माजी मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी टीका केली. गरीबांच्या कष्टातील कमाईवर सरकार दरोडा घालत आहे आणि त्याच्या कमाईतून असे कार्यक्रम केले जात आहेत. राज्यातील जनतेची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. पण सरकार नाच गाण्यावरील कार्यक्रमाला १०० कोटी रुपये देत आहेत. त्यांनी स्टार अभिनेत्यांनाही लक्ष्य केले आहे. स्टार अभिनेते जिथे उतरले आहेत त्या हॉटेलच्या खोलीचे भाडे दीड लाख रुपये आहे. त्यांना उत्तम दर्जाच्या सुविधा दिल्या जात आहे. हा जनतेच्या पैशाच्या अपव्यव आहे, असा आरोपही खाचरियावास यांनी केला आहे.  (CM Bhajanlal)

हेही वाचा :

माजी मुख्यमंत्र्यांच्या १४ ठिकाणांवर ईडीचे छापे

Related posts

Ghadi : ठाकरे गटाला महापालिका निवडणुकीपूर्वी धक्का

Babasaheb Ambedkar: बाबासाहेबांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान

Royal Challengers : बेंगळुरू पुन्हा विजयपथावर