Boxing Day test : नितीश-वॉशिंग्टनने तारले

Boxing day test

record

मेलबर्न : नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शतकी भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग-डे कसोटीत भारताचा डाव सावरला. या दोघांच्या खेळीमुळे भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये पहिल्या डावात ९ बाद ३५८ धावांपर्यंत मजल मारली. (Boxing Day test)

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ४७४ धावांपुढे भारताची अवस्था दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद १६४ अशी होती. शनिवारी पहिल्या सत्रात भारताने रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्या विकेट गमावल्या. रिषभ २८, तर जडेजा १७ धावांवर बाद झाला. उपाहारावेळी भारताच्या ७ बाद २४४ धावा झाल्या, तेव्हा भारतावर फॉलो-ऑनचेही सावट होते. परंतु, उपाहारानंतर नितीश-वॉशिंग्टन यांनी टिच्चून फलंदाजी करत भारताचा फॉलो-ऑन तर टाळलाच, पण त्याचबरोबर संघाला सव्वातीनशे धावांचा टप्पाही ओलांडून दिला. (Boxing Day test)

नितीश-वॉशिंग्टन यांनी आठव्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी रचली. अखेरच्या सत्रामध्ये नॅथन लायनने वॉशिंग्टनला बाद करून ही जोडी फोडली. वॉशिंग्टनने कसोटी फलंदाजीचा उत्कृष्ट नमुना पेश करत १६२ चेंडूंमध्ये केवळ एका चौकारासह ५० धावा केल्या. त्याचे हे कसोटीतील चौथे, तर ऑस्ट्रेलियातील दुसरे अर्धशतक ठरले. त्यानंतर जसप्रीत बुमराह शून्यावर परतला. नितीश ९९ धावांवर नाबाद असताना महंमद सिराज फलंदाजीस आला. त्याने तीन चेंडू सावधपणे खेळून काढल्यामुळे नितीशला पुढचे षटक खेळण्याची संधी मिळाली. ही संधी वाया न घालवता नितीशने चौकार ठोकून पहिल्यावहिल्या शतकाला गवसणी घातली. नितीशने संपूर्ण दिवस खेळपट्टीवर तळ ठोकून १७६ चेंडूंमध्ये १० चौकार व एका षटकारासह नाबाद १०५ धावा फटकावल्या. (Boxing Day test)

अगोदर अपुऱ्या प्रकाशामुळे व नंतर पाऊस आल्याने वीस षटके अगोदरच दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी, नितीश १०५, तर सिराज २ धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियातर्फे कर्णधार पॅट कमिन्स व स्कॉट बोलंड यांनी प्रत्येकी ३, तर लायनने २ विकेट घेतल्या. भारत अद्यापही पहिल्या डावात ११६ धावांनी पिछाडीवर आहे. शनिवारी वाया गेलेली षटके भरून काढण्यासाठी रविवारी नियोजित वेळेच्या अर्धा तास अगोदर (पहाटे ४.३०) खेळ सुरू करण्यात येईल. (Boxing Day test)

https://www.espncricinfo.com/series/australia-vs-india-2024-25-1426547/australia-vs-india-4th-test-1426558/full-scorecard

हेही वाचा :

 मेलबर्नमध्ये नितीशची विक्रमी खेळी

 भारताचा एकतर्फी मालिका विजय

Related posts

New Pope

New Pope: नव्या पोप यांच्या निवडीत चार भारतीयांचा सहभाग

Dhoni

Dhoni : पुढच्यावेळी योग्य संघबांधणी महत्त्वाची

BCCI Contracts

BCCI Contracts : श्रेयस, ईशानची वापसी