Blast in Paris : फ्रान्समधील रशियन दूतावासाजवळ स्फोट

Blast in Paris

Blast in Paris

पॅरिस : फ्रान्समधील मार्सिले येथील रशियन दूतावासाजवळ स्फोट झाला. रशियाने दहशतवादी हल्ला असल्याचा दावा केला आहे. या स्फोटाची फ्रान्सने सखोल चौकशी करावी, अशी मागणीही रशियाने केली आहे. तसेच परदेशी मिशनसाठी वाढीव सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. रशिया-युक्रेन संघर्षाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा स्फोट झाला. (Blast in Paris)
‘तास’च्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी म्हटले आहे की मार्सेलमधील रशियन वाणिज्य दुतावासाच्या हद्दीत झालेल्या स्फोटामध्ये दहशतवादी हल्ल्याची सर्व लक्षणे दिसत आहेत. (Blast in Paris)
दरम्यान अधिकाऱ्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशीच मार्सेली येथील रशियन वाणिज्य दुतावासाबाहेर एक स्फोट झाला. या परिसरात दोन बॉम्बसदृश वस्तू फेकण्यात आल्या, पण त्याचा स्फोट होऊ शकला नाही. बॉम्ब निकामी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते, अशी माहिती देण्यात आली आहे. (Blast in Paris)
बॉम्बसदृश वस्तू फेकणारा व्यक्ती घटनास्थळावरुन पळून गेली. पण या घटनेची चौकशी सुरू झाली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. संशयिताची ओळख किंवा संभाव्य कारणाबद्दल अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती उघड केलेली नाही. मार्सेलमधील झालेल्या रशियन दुतावासात झालेल्या स्फोटाची व्यापक चौकशी फेंच सरकारने करावी, अशी मागणी रशियाने केली आहे.

हेही वाचा :

बॉम्बच्या धमकीने विमान रोमला वळवले

महाकुंभहून परतताना गोकाकचे सहा भाविक ठार

Related posts

Sangram Thopate

Sangram Thopate: काँग्रेसला धोपटून संग्राम थोपटे भाजपमध्ये

PM Modi Warns

PM Modi Warns: हल्लेखोरांना सोडणार नाही

Firing on Tourist

Firing on Tourist : पर्वतांवरून उतरले आणि फायरिंग सुरू केले