पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न करण्याआधी ‘ती’ करणार धर्मांतर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  पाकिस्तानमधील क्रिकेटपटू रझा हसन लवकरच पूजा बोमन या भारतीय हिंदू तरुणीशी लग्न करणार आहे. या दोघांची एंगेजमेंट नुकतीच अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये पार पडली. पाकिस्तानमधील क्रिकेटपटूंनी भारतीय महिलांशी लग्न करणं काही नवीन बाब नाही. मात्र यावेळेस लग्न करणारी भारतीय तरुणी लग्नाआधी धर्मांतर करणार आहे.नंतर हे दोघे पुढील वर्षी लग्न बंधनात अडकणार आहेत. (Raza Hasan)

रझाने हसने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया वरुन एक पोस्ट करून आपल्या एंगेजमेंटची घोषणा केली होती. “सांगायला आनंद होतोय की मी आता एंगेज आहे. तू आयुष्यभरासाठी माझी हो अशी मागणी मी तिला घातली आणि तिने होकार दिला आहे. भविष्यातील दोघांच्या एकत्रित वाटचालीसाठी फार उत्साही आहे,” अशी पोस्ट करत दोघांचा एंगेजमेंटमधील फोटो शेअर केला आहे.

लग्नाआधीच धर्म बदलणार

पूजा बोमन ही हिंदू असून लग्नापूर्वी धर्मांतर करुन इस्लाम धर्म स्वीकारणार आहे. हे धर्मांतर पूजा स्वइच्छेने करत आहे की तिला लग्नापूर्वी रझाने तशी अट घातली आहे यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे. (Raza Hasan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Raza Hassan (@razahassan_100)

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत