बीड : धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडला पालकमंत्रिपद भाड्याने दिले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके शनिवारी केला. गुन्ह्याचा तपास लागेपर्यंत धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले. (Beed Morcha)
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन अनेक दिवस उलटले, पण अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही. याच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा आयोजित केला होता. मोर्चात सर्व पक्षांतील आमदा उपस्थित होती. मोर्चात वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी करण्यात आली.(Beed Morcha)
यावेळी आमदार सोळंके म्हणाले, देशमुख हत्या प्रकारणातील काही आरोपी मोकाटच आहेत. खंडणीतील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला अटक झालेली नाही. गेली चार वर्षे धनंजय मुंडे पालकमंत्री होते. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, धनंजय मुंडे यांनी पालकमंत्रिपद भाड्याने दिले.
ते म्हणाले, पालकमंत्र्यांचे अधिकार मिळाल्यानंतर पोलिस प्रशासन आणि प्रशासनावर जरब बसवली. फोन करुन पोलिस ठाण्यात कुणालाही अडकवायला सांगायचे. हजारो लोकांवर गुन्हे दाखल केले. ते परळी तालुक्यात गोदावरी नदीतून दररोज ३०० हायवा वाळूचा उपसा करतात. या हायवा कोणाच्या आहेत? या सर्व गोष्टीला ज्यांनी वाल्मिक कराडच्या पाठिमागे शक्ती उभी केली ते धनंजय मुंडे सरकारमध्ये असतील तर कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही. आजचा मोर्चा आमचे पहिले पाऊल आहे. आम्हाला न्याय मिळाला नाही तर या पेक्षा मोठे आंदोलन करावे लागेल, असा इशाराही सोळंके यांनी यावेळी दिला.(Beed Morcha)
ही आमच्या बीड जिल्ह्याची करुण कहाणी आहे. मी करुणा कहाणी नाही म्हणत नाही. तिची तर कहाणी वेगळीच आहे. मी फक्त करुण कहाणी म्हणतोय, असे सांगून आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी पुन्हा केली.
मुंडेंचा राजीनामा घ्या : संभाजीराजे
माजी खासदार संभाजीराजे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. तुम्ही परखड आहे म्हणता मग त्यांना संरक्षण देता, ते तुम्हाला पटतेय का, असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी खऱ्या आरोपीला अटक करून दाखवावी. कराडला संरक्षण देणारे तिथले मंत्री यांची हकालपट्टी का झाली नाही? धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड कुठे आहे हे माहिती नसणे हे पटणारे नाही. मुंडेंचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे.
आव्हाडांचा गौफ्यस्फोट
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक गौप्यस्फोट केला. एका अधिकाऱ्याच्या मुलाखतीचा हवाला देत ते म्हणाले की, बीडमध्ये असताना नेहमी मारामारी व्हायची. दर दोन दिवसाने मारामारी होत होती. एका कलेक्टरची बदली झाली. तो कलेक्टर पुन्हा दिसला नाही. खरे काय माहीत नाही. पण या अधिकार्याकडून माहिती घ्या. त्यांच्या तोंडातून सत्य बाहेर येऊ द्या, असे आवाहन आव्हाड यांनी केले.
हेही वाचा :