Beed Jail : कारागृहात वाल्मिक कराडला मारहाण!

Beed Jail

Beed Jail

बीड : प्रतिनिधी : बीड कारागृहात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. दरम्यान बीड कारागृह प्रशानाने धस यांच्या दाव्याचे खंडन केले आहे. कारागृहात दोन गटात राडा झाल्याची माहितीही आमदार धस यांनी पत्रकार परिषदेत दिली. कराड आणि घुले यांना महादेव गिते आणि अक्षय आठवले टोळीकडून मारहाण झाल्याची माहिती पुढे आली आहे. मारहाणीच्या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी तरुंग प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. (Beed Jail)

आमदार सुरेश धस यांनी माहिती देताना तुरुंगात राडा झाल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, “ बीड कारागृहात दोन टोळ्यांमध्ये वाद झाल्याचे समजले आहे. कारागृह प्रशासन जरी इतरांची नावे सांगत असले तरी हा वाद मुख्य दोन टोळ्यामध्ये झाला आहे. बीडच्या कारागृहात काहीही होऊ शकते. माझी तर माहिती आहे की आकांना स्वतंत्र जेवण दिले जाते. एक स्पेशल फोन आहे ज्यावरुन आकाचं कनेक्शन परळीतील कोणत्यातरी फोनशी होत आहे अशी माहिती मला मिळाली आहे” (Beed Jail)

मुख्यालयात असूनही कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे असे सांगून धस यांनी बाहेर हत्या करुन थकलेत. ते आत जाऊन हत्या करणार नाहीत कशावरुन? असा प्रश्नही धस यांनी उपस्थित केला आहे. (Beed Jail)

पाच क्रमांकाच्या बॅरेकमध्ये महादेव गिते, सहामध्ये अक्षय आठवले तर नऊ मध्ये वाल्मिक कराडला ठेवण्यात आले आहे. जेवणासाठी आणि इतर कारणासाठी ज्यावेळी आरोपींना बाहेर आणले असेल तेव्हा हाणामारी झाली असावी, असा अंदाज आमदार धस यांनी व्यक्त केला आहे. (Beed Jail)

तुरुंगात कर्मचारी कमी असल्याने अधिकाऱ्यांनी काही आरोपींना अमरावती, नागपूर, नाशिक, संभाजीनगर येथील तुरुंगात पाठवायला हवे होते. अनेक आरोपी लातूर तुरुंगच का मागतात? असा प्रश्न धस यांनी विचारला. (Beed Jail)

बीडच्या तुरुंगात कालिया तयार झाला आहे

“आका आणि त्यांच्या समर्थकांना अमरावती किंवा नागपूरच्या कारागृहात का पाठवले जात नाही? शोले चित्रपटात जेलर म्हणतो की ‘जेल के कोने कोने मे हमारे जासूस है’ मग हे जासूस काय करत आहेत?  कालिया चित्रपटात आम्ही तुरुंगात झालेल्या हाणामाऱ्या पाहिल्या होत्या. आता बीडच्या कारागृहात कालिया तयार झाला आहे की काय कुणास ठाऊक” असेही धस म्हणाले. (Beed Jail)

कारागृहाने मारहाणीचे वृत्त फेटाळले

वाल्मिकी कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याचे वृत्त कारागृह प्रशासनाने फेटाळले. कारागृहात राजेश वाघमोडे आणि सुधीर सोनवणे यांच्यामध्ये फोनसाठी वाद झाला होता. हा वाद सुरू असताना काही इतर कैदीही जमले होते. त्या ठिकाणी वाल्मिकी कराड आणि सुदर्शन घुले नव्हते. त्यामुळे त्यांना मारहाण झाल्याचे वृत्त चुकीचे आहे असा दावा विशेष महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी केला आहे. (Beed Jail)

हेही वाचा :   

रेड क्रॉसचे आठ वैद्यकीय कर्मचारी हल्ल्यात ठार

६० तासांनी ढिगाऱ्याखालून चौघे जिवंत सापडले

Related posts

Athani murder

Athani murder : खून डोंगरावर, क्लू जयसिंगपूरमध्ये, आरोपी अथणीत

Team Khandoba

Team Khandoba: ‘खंडोबा’ उपांत्य फेरीत, ‘सम्राटनगर’ पराभूत

Congress Slams Bhandari

Congress Slams Bhandari: पोलिसांनी माधव भंडारींची चौकशी करावी