बाबाभाई वसा यांचे निधन

कोल्हापूर;  प्रतिनिधी : कोल्हापूरचे डीझेल इंजिन निर्यात उत्पादनातील प्रसिद्ध उद्योगपती गजेंद्रभाई तथा बाबाभाई वसा यांचे अल्पशा आजाराने  आज (दि.१६)  सकाळी निधन झाले ते ८५ वर्षाचे होते. बाबाभाई यांनी औद्योगिक मंदी, व्यासायिक स्पर्धा यावर लीलया मात करत कोल्हापूरच्या उद्योग जगताचा डंका वाजविला होता. त्याकाळात त्यांनी उद्योगात नवनवीन प्रयोग सातत्य ,चिकाटी ,जिद्द याच्या जोरावर “कॉमेट” या नावाचे कमी वजनाचे सहज कोठेही हलविता येणारे पोर्टेबल डीझेल इंजिन निर्माण करून क्रांती घडविली होती .माझ्या शब्दकोशात मंदी हा शब्दच नाही असे ते नवीन उद्योजकांना सांगत असत. कौशल्य , कामाचा आवाका आणि वेग या त्रिसूत्रीचा अवलंब करून आपण यशवी उद्योजक होऊ शकतो हे सिद्ध करून आपली उत्पादने रॉकेट इंजिनियरिंग कोर्पोरेशन यानावाने साता समुद्रपार पोहचविली.

गुणवत्ता , दर्जा याला वेगळा आयाम देत त्यांनी नवीन संशोधन वापरत स्थानिक बरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात मशीन निर्यात करून उभारी घेतली. निर्यात सुरु केल्यानंतर त्यना एकूण उत्पादनाच्या ४५ टक्के डीझेल इंजिन निर्यात होऊ लागले आणि इथेच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. भविष्यात रॉकेट इंजिनियरिंग हे नाव स्थानिक बरोबरीने आंतर राष्ट्रीय स्तरावर पोहचले.

१४ एप्रिल १९३९ साली जन्मलेल्या बाबाभाई यांनी उद्योग व्यवसाय सांभाळत ज्या मातीत घडलो त्या मातीचे देणे लागतो या भावनेने भूकंपग्रस्त , दुष्काळग्रस्त , कर्करोग , हृदयरोग अशा गरजू अनेक रुग्णांना त्याचबरोबर सामाजिक उपक्रमांना त्यांनी सढळ हाताने मदत केली.
बाबाभाई यांच्या मागे पत्नी चार मुली जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. काही वर्षापूर्वी त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे निधन झाले होते त्या धक्क्यातून ते सावरण्याचा प्रयत्न करत होते.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी