ऑस्ट्रेलियाने भारतला दमवले

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गाबा कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने सात गडी गमावून ४०५ धावा केल्या आहेत. मिचेल स्टार्क ७ धावांवर तर, ॲलेक्स कॅरी ४५ धावांवर खेळत आहे. ट्रॅव्हिस हेड (१५२) आणि स्टीव्ह स्मिथ (१०१) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ४०० धावांचा टप्पा पार केला. गोलंदाजीत भारताकडून जसप्रीत बुमराहने पाच विकेट घेतल्या. (AUS vs IND Test)

आज (दि.१५) ऑस्ट्रेलियाने बिनबाद २८ धावांवर खेळण्यास सुरूवात केली. ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिड हेड आणि स्टिव स्मिथच्या शतकी कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलिआने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सात फलंदाज गमावून ३७७ धावा केल्या. बुमराहने पहिल्या सत्रात उस्मान ख्वाजा (२१) आणि नॅथन मॅकस्विनी (९) यांना बाद करून दोन धक्के दिले. यानंतर पहिल्या सत्रातच नितीश रेड्डीने मार्नस लॅबुशेनला (१२) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र, यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडने दुसऱ्या सत्रात एकही विकेट पडू दिली नाही. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २४२ धावांची भागीदारी केली.

हेडने आपल्या कसोटी कारकिर्दीतील नववे शतक तर स्मिथने ३३वे शतक झळकावले. स्मिथ १९० चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने १०१ धावा करून बाद झाला. तर हेड १६० चेंडूत १८ चौकारांच्या मदतीने १५२ धावा करून बाद झाला. यानंतर मिचेल मार्श ५, कर्णधार पॅट कमिन्स २० धावा करून बाद झाले. कमिन्सने कॅरीसोबत सातव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. बुमराहने पाच विकेट घेतल्या. तर सिराज आणि नितीशला प्रत्येकी एक विकेट मिळाली. (AUS vs IND Test)

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत