Attemp to kidnapping: शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न आणि…

Attemp to kidnapping

ठाणे : भिवंडी परिसरात एका किशोरवयीन मुलीच्या बाबतीत एक भयंकर आणि तितकाच थरारक प्रसंग घडला. आपले अपहरण होत आहे हे लक्षात येताच या मुलीने धाडसाने आणि विवेकबुद्धीने सुटका करून घेतली. शाळेजवळ रिक्षा थांबवण्यास सांगूनसुद्धा ती पुढे दामटण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षाचालकावर तिने भूमिती कंपासाने हल्ला केला आणि चालत्या रिक्षातून उडी मारत तिने स्वत:ची सुटका करून घेतली. (Attemp to kidnapping)

संबंधित मुलगी १६ वर्षाची आहे. शाळेत जाण्यासाठी ती एका रिक्षात बसली. या रिक्षात आधीपासूनच एक प्रवासी होता. रिक्षा शाळेजवळ येताच तिने थांबवण्याची विनंती केली. तरीही रिक्षाचालकाने रिक्षा थांबवण्याऐवजी वेग वाढवला.

परिस्थिती समजून घेत, मुलीने भूमिती कंपास काढला आणि चालकावर हल्ला केला. तिने तिच्या शेजारी बसलेल्या माणसाला ढकलून दिले आणि आणि चालत्या रिक्षातून उडी मारली आणि स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर, ती तिच्या शाळेच्या परिसरात पोहोचली. (Attemp to kidnapping)

बुधवारी (९ जुलै) हा भयंकर प्रसंग भिवंडीत घडला. ही थरारक घटन मुलीने आपल्या पालकांना सांगितली. त्यानंतर तिच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले आहे की, मुलगी बुधवारी तिच्या शाळेत जाण्यासाठी रिक्षात चढली होती. त्यात एक अज्ञात पुरूष आधीच होता. रिक्षा तिच्या शाळेजवळ पोहोचताच मुलीने चालकाला थांबायला सांगितले, परंतु तो थांबला नाही आणि वेगाने निघून गेला. मुलीने कशा पद्धतीने सुटका करून घेतली तेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. (Attemp to kidnapping)

त्यानंतर शांती नगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम १३७(२) (अपहरण) आणि ६२ (आजीवन कारावास किंवा इतर कारावासाची शिक्षा असलेले गुन्हे करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

‘‘या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे,’’ असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा :
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाचा जयंत पाटील यांचा राजीनामा
ईडीकडून रोहित पवार यांच्याविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

मुक्तीचे जीवनगाणे…. ब्रिजेट बार्दो, डॉ. रुथ लॉरेन्स