पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला

Attack on Sukhbir Singh Badal in Nanded

नांदेड : प्रतिनिधी : पंजाबचे माजी उप मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरुवारी नांदेड येथे जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी ६२ वर्षीय हल्लेखोर जसपाल सिंह याला ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बादल यांच्याशी संपर्क करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. (Attack on Sukhbir Singh Badal in Nanded)

बादल यांच्यावर कृपानाने हल्ला

नांदेड येथील तख्त श्री हुजुर साहिब परिसरातील माता साहिब गुरुद्वाराजवळ सुखबीर सिंग बादल पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासह गुरुद्वारात सकाळी अकरा वाजता आले होते. पावनेदोन वाजण्याच्या सुमारास गुरुद्वारात सेवेकरी असलेल्या एका निहंगाने कृपानाने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांच्या हाताला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी तिथे चार निहंग उपस्थित होते. बादल यांच्या सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला रोखत बाजूला केले. पोलिसांनी जसपाल सिंग या हल्लेखोराला अटक केली. तो गेले दोन वर्षापासून त्याच गुरुद्वार परिसरात रहात होता अशी माहिती पुढे आली आहे.

बादल यांच्या हल्ल्यानंतर खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच सुखबीर सिंग बादल यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

पोलिस अधिकाऱ्याने धाडसाने बचाव केला

नांदेडचे जिल्हाधिकारी राहूल कार्डिले यांनी सांगितले की दुपारी पावनेदोन वाजण्याच्या सुमारास गुरुद्वारातील सेवादाराने बादल यांच्यावर हल्ला केला. यावेळी पोलिस दलातील एका अधिकाऱ्यांने धाडसाने त्यांचा बचाव केला. या घटनेत दोघे किरकोळ जखमी झाली आहेत. घटनेतील हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले असून पोलिस चौकशी करत आहेत. (Attack on Sukhbir Singh Badal in Nanded)

यापूर्वीही बादल यांच्यावर झाला होता हल्ला

सुखबीर सिंग बादल यांच्यावर डिसेंबर २०२४ मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. धार्मिक शिक्षा मिळाल्यानंतर बादल सुवर्ण मंदिरात सेवादार म्हणून सेवा देत होते. त्यावेळी एका भक्ताने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. सुखबीर सिंग बादल व्हिलचेअरवर बसले असताना नारायण सिंह चौरा त्यांच्याजवळ आला. त्याने पिस्तूलातून गोळी झाडली होती. मात्र बादल यांच्याजवळ असलेल्या एका व्यक्तीने हल्लेखोराचा हात पकडल्याने गोळी भिंतीला लागली आणि त्यातून बचावले होते.  (Attack on Sukhbir Singh Badal in Nanded)

Related posts

विटा सांगलीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक; दोन ठार, १६ जखमी

महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की; २५ लाखांची भरपाई पोलिसांच्या पगारातून वसूल करा 

तिरंगा यात्रेमुळे ५२ वर्षे ध्वज न फडकवण्याचा इतिहास पुसणार नाही :  महेश तपासे