Athavale meet D.Y.Patil :  रामदास आठवलेंनी घेतली डी.वाय.पाटील यांची भेट

Athavale meet D.Y.Patil

कोल्हापूर :प्रतिनिधी : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक आणि त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांची भेट घेतली. डॉ. पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करून आठवले यांनी शैक्षणिकसह विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. (Athavale meet D.Y.Patil)

केंद्रीय मंत्री आठवले सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. सकाळी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर रामदास आठवले यांनी कसबा बावडा येथे यशवंत निवासस्थानी जाऊन पद्मश्री डॉक्टर डी. वाय.  पाटील यांची भेट घेतली. डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन आठवले यांचे स्वागत केले. यावेळी यावेळी आरपीआय आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे, प्रा.  शहाजी कांबळे श्री राम सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे, सुभाष बुचडे, श्रीराम सोसायटीचे माजी चेअरमन राजीव चव्हाण, महादेव लांडगे, मिलिंद पाटील, राजीव चव्हाण,सागर यवलुजे उपस्थित होते. (Athavale meet D.Y.Patil)

डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबीय आणि आठवले कुटुंबीयांचे गेल्या अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्यावर आठवले यांनी पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आठवले यांनी डॉ. डी. वाय पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करत शिक्षण क्षेत्रासह विविध विषयावर चर्चा केली. (Athavale meet D.Y.Patil)

Related posts

चंद्रकांतदादा, मुश्रीफांचे सहकार कायदा बदलण्याचे षढयंत्र ; सतेज पाटील यांचा आरोप

गोकुळ निवडणुकीत माजी आमदार सत्यजित पाटील सतेज पाटलांसोबत

एसआयआरअंतर्गत  राज्यातील मतदार यादीतून २ कोटी ६ लाख नावे वगळली