‘कागल’च्या जनतेची माफी मागा

कोल्हापूर; प्रतिनिधी : वैद्यकीय सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ वारंवार खालच्या दर्जाची, अशोभनीय व्यक्तव्ये करीत आहेत. ‘कागल’ राजर्षी शाहू महाराजांची जन्म व कर्मभूमी आहे. शाहू महाराजांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वास पुढे आणून पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला. अशा थोर पुरुषांच्या विचारांचा अपमान हसन मुश्रीफ करीत असून त्यांनी कागलच्या जनतेची माफी मागायला हवी. यांचा काय आदर्श घेणार असा हल्लाबोल ‘शाहू’ ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी केला. (Samarjeet Ghatge)

हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथील एका कार्यक्रमात ‘समरजीत घाटगे यांच्याबद्दल खालच्या शब्दात टीका केली होती. याविषयी बोलताना घाटगे म्हणाले, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीकडून पुरोगामी कोल्हापुरातील जनतेने काय आदर्श घ्यायचा? शाहूंच्या कागलची ही बदनामी नव्हे का? यापूर्वी दिवंगत विक्रमसिंह घाटगे, सदाशिवराव मंडलिक, श्रीपतराव शिंदे, बाबासाहेब कुपेकर, आप्पासाहेब नलवडे यांच्यामध्ये टोकाचे मतभेद झाले. पण त्यांनी कधी अशी पातळी सोडली नाही. वारंवार शाहू महाराजांच्या कागलचा अपमान ते करत असून याच राजघराण्याने त्यांना राजकारणात आणले हे ते विसरले का?

निवडणूक अजून जाहीर झालेली नसतानाही मुश्रीफ यांची ही अवस्था झाली आहे. ही निवडणूक मुश्रीफ विरुद्ध ‘कागल’ची स्वाभिमानी जनता, अशी लढत होणार असल्याने याचा त्यांना अंदाज आला आहे. (Samarjeet Ghatge)

‘ईडी’च्या धाडीवेळी पळून का गेला..

हसन मुश्रीफ यांच्या घोरपडे साखर कारखान्याच्या शेअर्सपोटी शेतकऱ्यांकडून गोळा केलेले ४० कोटी त्यांनी खाल्ल्याचा आरोप आपण केला होता. त्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, तुरुंगवास इतर गोष्टी पुढच्या होत्या, मात्र त्या आधीच ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोडून गेले. दोषी नव्हता, तर ‘ईडी’चे पथक दारात आल्यानंतर आपण मागच्या दाराने पळून का गेला? असा सवाल समरजीत घाटगे यांनी केला.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी