Anurag Thakur : ठाकूरांची उमेदवारी दाखल करून घ्या

Anurag Thakur

Anurag Thakur

डेहराडून : माजी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचा भारतीय बॉक्सिंग संघटनेच्या (बीएफआय) अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा मार्ग गुरुवारी मोकळा झाला. ठाकूर यांना अपात्र ठरवण्याच्या बीएफआयच्या निर्णयास हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने स्थगिती देतानाच त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याचे आदेशही दिले. (Anurag Thakur)

बीएफआयचे अध्यक्ष अजय सिंह यांनी ७ मार्च रोजी ठाकूर यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले होते. केवळ बीएफआयमध्ये निवडून आलेले सदस्यच अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी पात्र असल्याचे कारण त्यांनी ठाकूर यांना अपात्र ठरवले. ठाकूर यांनी हिमाचल प्रदेश बॉक्सिंग संघटनेचे प्रतिनिधी म्हणून बीएफआयच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली होती. अपात्र ठरवण्यात आल्यानंतर त्यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायाधीश अजय मोहन यांनी अपात्रतेच्या निर्णयास स्थगिती दिली. न्यायालयाचा हा निर्णय अभ्यासल्यानंतर याविषयी पुढील पावले उचलू, असे बीएफआयतर्फे सांगण्यात आले आहे. (Anurag Thakur)
बीएफआयच्या नव्या कार्यकारिणीसाठी २८ मार्च रोजी निवडणूक होत आहे. ठाकूर यांना उमेदवारी दाखल करता यावी, यासाठी बीएफआयने अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. बीएफआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहण्यासही ठाकूर यांना न्यायालयाने परवानगी दिली आहे. बीएफआयची निवडणूक अगोदर २ फेब्रुवारी रोजी होणार होती. तथापि, भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) ॲड-हॉक समिती नियुक्त केली होती. त्याविरोधात बीएफआयने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या समितीला दिल्ली न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता ही निवडणूक होणार आहे. (Anurag Thakur)

हेही वाचा :
तीन सामन्यांसाठी रियान परागकडे नेतृत्व
भारतीय संघाला ५८ कोटींचे बक्षीस

Related posts

Ajinkya Rahane

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला दुखापत

Vaibhav Suryavanshi

Vaibhav Suryavanshi : वैभवची विक्रमांना गवसणी

Preity Zinta

Preity Zinta : कर्णधारपदासाठी श्रेयसलाच पसंती