Ambedkar Chair: शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताह

Ambedkar Chair

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ९ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, ९ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात सप्ताहाचे उद्घाटन होणार आहे. (Ambedkar Chair)

समारंभावेळी प्रा. दत्ता भगत लिखित “भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान”  या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. प्रा. डॉ. गिरीश मोरे व प्रा. डॉ. पी. एस.कांबळे यांची व्याख्याने होणार आहेत. प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील अध्यक्षस्थानी असतील.

या विविध उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक आणि अधिष्ठाता  प्रा.डॉ. श्रीकृष्ण महाजन व कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले आहे. (Ambedkar Chair)

  • कार्यक्रम असे :
  • १० एप्रिल : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त “डॉ. पंजाबराव देशमुख यांचे शिक्षणविषयक विचार व कार्य ” या विषयावर डॉ. नितीन रिंढे (मुंबई) यांचे व्याख्यान शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिववार्ता’ या युट्यूब चॅनेलवरून सकाळी १०.३० वाजता प्रसारित होईल. (Ambedkar Chair)
  • ११ एप्रिल : महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त “महात्मा जोतीराव फुले  यांचे शिक्षणविषयक विचार व कार्य ” या विषयावर डॉ. श्यामसुंदर मिरजकर  (मायणी) यांचे व्याख्यान शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिववार्ता’ या युट्यूब चॅनेलवरून सकाळी १०.३० वाजता प्रसारित होईल.
  • १२ एप्रिल : “लघुपट सादरीकरण व चर्चा ” मानव्यशास्त्र सभागृहात होणार असून यावेळी चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. (Ambedkar Chair)
  • १३ एप्रिल : “राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे शिक्षणविषयक विचार व कार्य ” या विषयावर ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पचिंद्रे यांचे व्याख्यान शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिववार्ता’ या युट्यूब चॅनेलवरून सकाळी १०.३० वाजता प्रसारित होईल. (Ambedkar Chair)

    १४ एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के व प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते सकाळी १० वा. प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर लगेचच राजर्षी  शाहू सिनेट सभागृहात “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणविषयक विचार व कार्य ” या विषयावर अमिटी विद्यापीठाचे उप प्र-कुलगुरू डॉ. गौतम गवळी यांचे व्याख्यान होईल.

    हेही वाचा :
    भवाळकर, जाधव, चव्हाण यांना शिवाजी विद्यापीठाचे पुरस्कार
    रुद्रांक्ष पाटीलला सुवर्ण

Related posts

Burglary : पेट्रोल चोराकडून १४ घरफोड्या उघडकीस

Professor sucide : पत्नीचा खून करून प्राध्यापकाची आत्महत्या

Rape accused granted bail: बलात्कारासाठी संबंधित युवतीच जबाबदार