मुंबई : निर्लज्ज, एहसान फरामोश अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. (Aditya attacks on Shinde)
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या चौदाव्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसून आले. शिंदे यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देण्याचा प्रयत्न करणारा आमदार भास्कर जाधव यांना बोलू दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांवर दुतोंडी अशी टीका केली. त्यानंतर युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. एवढी एहसान फरामोश, नमक हराम, निर्लज्ज व्यक्ती मी कधी पाहिली नाही, असा संताप व्यक्त केला.
ते म्हणाले, नगरविकास खाते किंवा समृद्धीत भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांच्या घरी ईडी पोहोचली, म्हणून त्यांना सूरतला पळून जावे लागले. वॉशिंग मशीनमध्ये उडी घ्यावी लागली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुढे आणले, आमदारकी दिली, मंत्रीपद दिले, मुख्यमंत्री स्वत:कडे ठेवणारे नगरविकास खाते दिले. त्यामुळे उद्धव साहेबांवर आरोप करताना थोडी तरी लाज बाळगा, अशा जोरदार हल्ला त्यांनी केला. (Aditya attacks on Shinde)
अधिवेशनादरम्यान, गेल्या तीन आठवड्यांपासून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी सदस्यही जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर प्रश्न उपस्थित करत आहोत. सत्ताधारी बॅकफूटवर जावेत अशी आमची भूमिका नाही. पण बेस्ट, शेतकरी आत्महत्या, धारावीच्या जमीन घोटाळ्याचा विषय यासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे सरकारकडून हवी आम्ही जनतेतून निवडून आलेलो लोक असून आम्हाला मतदारसंघातील जनतेला उत्तर देणे भाग आहे. ते आमचे कर्तव्यही आहे, याची जाणीव सत्ताधाऱ्यांनी ठेवली पाहिजे, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला. नगरविकास खात्याचे मंत्री उत्तर देत होते. पण आम्ही घाणेरडे भाषण ऐकण्यासाठी किंवा दोन अडीच वर्षापासून जो खोटारडेपणा सुरू आहे ते ऐकण्यासाठी येथे आलेलो नाही. राईट टू रिप्लायसाठी गेले तेव्हाही समोरून आरडाओरडा सुरू झाला, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. जिथे जिथे भ्रष्टनाथ मिंधेंनी हात घातला आहे, तिथे सगळीकडे पैसे काढण्याचे काम केले आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. (Aditya attacks on Shinde)
हेही वाचा :
महादेव मुंडेचं काय झालं?
भास्कर जाधवांचा संताप अनावर, अध्यक्षांबद्दल म्हणाले…