आयफोनच्या निर्यातीत ३५ टक्के वाढ

नवी दिल्ली;  वृत्तसंस्था : सप्टेंबर महिन्याच्या सहामाहीत भारतातून ॲपलच्या आयफोनच्या निर्यातीत जवळपास एक तृतीयांश वाढ झाली आहे. यावरून भारतात ॲपलचे उत्पादन वाढणे आणि चीनवरील अवलंबित्व कमी होत असल्याचे सूचित होते. कंपनीने ६०० दशलक्ष डॉलर किमतीचे भारतात बनवलेले आयफोन निर्यात केले.

‘ॲपल’ची वार्षिक निर्यात २०२४ च्या आर्थिक वर्षात १ अब्ज डॉलर पार करेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी ‘ॲलपन’ने मुंबई आणि नवी दिल्ली येथे त्यांचे स्टोअर उघडले. आता लवकरच चार शहरांमध्ये आणखी चार स्टोअर सुरू होतील. ‘ॲपल’ भारतात आपले उत्पादन नेटवर्क झपाट्याने विस्तारत आहे. स्थानिक सबसिडी, कुशल कामगार आणि देशाच्या प्रगत तांत्रिक क्षमतांचा फायदा होत आहे. चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या ‘ॲपल’च्या प्रयत्नांमध्ये भारत हा महत्त्वाचा भाग आहे. अमेरिका आणि चीनमधील तणावामुळे ॲपल चीनबाहेर आपले स्थान मजबूत करण्यावर भर देत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ते भारतात उत्पादनावर भर देत आहे. तैवानचा ‘फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप,’ ‘पेगाट्रॉन कॉर्प’ आणि भारताचे टाटा इलेक्ट्रॉनिक्स’ दक्षिण भारतात आयफोन असेंबल करत आहेत.

निम्मे आयफोन चेन्नईच्या बाहेरील भागात ‘फॉक्सकॉन’द्वारे तयार केले जात आहेत. टाटा समूहाच्या कर्नाटकातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन युनिटने सप्टेंबर तिमाहीत १७० दशलक्ष डॉलर किमतीचे आयफोन निर्यात केले. टाटाने हे युनिट गेल्या वर्षी ‘विस्ट्रॉन’कडून खरेदी केले होते. भारतातून निर्यात होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये ‘आयफोन’चे वर्चस्व आहे. व्यापार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत २८८ दशलक्ष डॉलर  किमतीचे ‘आयफोन’ अमेरिकेत निर्यात करण्यात आले. पाच वर्षांपूर्वी, म्हणजे भारतात उत्पादन वाढण्यापूर्वी, ‘ॲपल’ची अमेरिकेत वार्षिक ‘आयफोन’ निर्यात केवळ ५२ लाख डॉलर होती. तथापि, आता जर आपण देशांतर्गत बाजाराबद्दल बोललो तर, ‘ॲपल’चा येथील स्मार्टफोन मार्केटमध्ये फक्त ७ टक्के हिस्सा आहे आणि तो शिओमी, ओप्पो आणि विवो यांसारख्या चीनी ब्रँडच्या मागे आहे.

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले