सरकार आल्यास महिलांना महिना ३ हजार : राहूल गांधी

Rahul Gandhi file photo

मुंबई; जमीर काझी : भाजपाने ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स या यंत्रणाच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार चोरले. केवळ अदानी आणि अंबानींसाठी काम करणारे सरकार बनवले. त्यामुळे राज्यातील सर्व उद्योगधंदे, प्रकल्प गुजरातकडे गेले. या निवडणुकीत त्यांना धडा शिकवून पुन्हा महाविकास आघाडीच्या हातात सत्ता द्या. आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर महिलांना दर महिना तीन हजार रुपये आणि मोफत एसटी प्रवास देण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी येथे दिले. (Maharashtra)

महालक्ष्मी सन्मान योजनेची घोषणा त्यांनी यावेळी केली. मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर महाविकास आघाडीच्या वतीने आयोजिलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेत ते बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकताना जाहीरनाम्यातील पंचसूत्री जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी आणि कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अर्थसहाय्य देण्याचे जाहीर केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तरुणांना दर महिना चार हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी २५ लाखांपर्यंत आरोग्य विमा व मोफत औषधे देण्याचे जाहीर केले. सभेला काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट व अन्य घटक पक्षांतील कार्यकत्यांनी मोठी गर्दी केली होती. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा व आरएसएसवर कडाडून हल्ला चढविला. (Maharashtra)

आपली लढाई ही संविधान आणि संविधानाला संपवणाऱ्या विचारधारेविरुद्ध असल्याचे सांगितले. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा राज्यात जातीय जनगणना करण्याचे व ५० टक्के आरक्षणाची मर्यादा काढून टाकण्याचे काम करणार असल्याचेही जाहीर केले. ते म्हणाले, भाजपा आणि संघाकडून छुपेपणाने संविधान कमकुवत केले जात आहे. देशभरात विद्यापीठांमध्ये जे कुलगुरू आहेत त्यांची यादी काढा. त्यात तुम्हाला संघाचेच सदस्य दिसतील. भूगोल, इतिहास, विज्ञान माहीत नसेल तरीही काही फरक पडत नाही. केवळ संघाचे सदस्य असणे हीच त्यांची पात्रता ठरवली गेली आहे. निवडणूक आयोग, इंडी, सीबीआय यांचा वापर करून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. कारण काही व्यावसायिकांची मदत भाजपाला करायची होती. मुंबईतली धारावीची जमीन ही एक लाख कोटींची आहे

Related posts

Juna Budhvar win title

Juna Budhvar win title : ‘जुना बुधवार’ चे पहिलेवहिले विजेतेपद

Tiger death

Tiger death : चार महिन्यांत वीस वाघांचा मृत्यू

ED office

ED office : ईडी कार्यालय इमारतीला आग