लग्नखर्चात २५ टक्क्यांनी वाढ

इंदूर; वृत्तसंस्था : वाढत्या महागाईमुळे या वर्षी लग्नसमारंभावरील खर्चात सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असतानाही देवोत्थान एकादशीपासून सुरू होणाऱ्या लग्नसराईचा उत्साह कमी झालेला नाही. महागडे वेडिंग डेस्टिनेशन, जेवण, सजावट आणि इतर व्यवस्था असूनही लोक लग्नसोहळे भव्यदिव्य करण्यासाठी उत्सुक असतात. (wedding expenses)

पुढील दोन महिन्यांत देशभरात ४८ लाखांहून अधिक विवाह होतील. त्यातून अंदाजे सहा लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल. उच्च मध्यमवर्गापासून ते उच्चभ्रू वर्गापर्यंतचे लोक इव्हेंट मॅनेजमेंटची मदत घेत आहेत आणि लग्नात जेवण, सोशल मीडिया आणि संगीतावर विशेष भर देत आहेत. लग्न समारंभात खाण्यापिण्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. जिथे पूर्वी ५००-९०० रुपये प्रति प्लेट जेवण मिळत होते, आता तेच ताट १२००-१७०० रुपयांवर पोहोचले आहे. खर्च नियंत्रित करण्यासाठी, बरेच लोक पाहुण्यांची संख्या ८००-१००० पर्यंत मर्यादित करत आहेत.

इंदूरसह इतर शहरांमध्ये गार्डन्स आणि हॉटेल्सचे बुकिंग दर १० टक्क्यांनी वाढले आहेत. बँड आणि घोडीचे किमान भाडेही वाढले आहे. आता बँडची सुरुवातीची किंमत ११ हजार रुपये रुपये झाली आहे आणि घोडीचे किमान भाडे ३,१०० रुपये झाले आहे. आता पारंपारिक खाद्यपदार्थांबरोबरच बहुविध पदार्थांचा ट्रेंड वाढला आहे. चाट, जपानी, कुरियन, ओरिएंटल, इटालियन, मेक्सिकन आणि चायनीज पदार्थांचा समावेश तरुण आणि महिलांच्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी केला जात आहे.

Related posts

pooja khedkar: पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Sheikh Hasina : शेख हसीनांना आमच्याकडे सोपवा

Rahul gandhi : सोमनाथची पोलिसांकडूनच हत्या