11 devevotees killed: अकरा भाविकांचा मृत्यू

11 devevotees killed

जयपूर : व्हॅन आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात राजस्थानातील दौसा येथे ११ भाविकांचा मृत्यू झाला. बुधवारी (१३ ऑगस्ट) पहाटे ही दुर्घटना घडली. खाटू श्यामजी येथून हे सर्व भाविक परतत होते. (11 devevotees killed)

यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनर ट्रकला पिकअप व्हॅनने धडक दिली. त्यात ७ मुलांसह ११ जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत १२ जण जखमी झाले आहेत.

पोलीस आणि रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील खातू श्यामजी धाम येथे पूजा करून काही भाविक उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील असरोली या त्यांच्या गावी परतत होता. यावेळी त्यांच्या गाडीने रस्त्याकडेला असलेल्या हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या कंटेनर ट्रकला धडक दिली. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दौसा-मनोहरपूर राज्य महामार्गावरील बसेदी बायपास कल्व्हर्टजवळ हा अपघात झाला. (11 devevotees killed)

येथील एसएमएस रुग्णालयात ७ मुलांसह दहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेचा जखमींमुळे मृत्यू झाला.

मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. जखमींना दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथून ९ जणांना एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर तिघांना दौसा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी मोठ्या प्रमाणात झालेल्या मानवी जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. जिल्हा प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनाला जखमींना त्वरित मदत आणि वैद्यकीय मदत देण्याचे आदेश दिले आहे. (11 devevotees killed)

राजस्थानचे कृषी मंत्री डॉ. किरोडी लाल मीणा स्वतः एक वैद्यकीय व्यावसायिक आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार दौसा येथे जाऊन डॉ. मीणा यांनी रुग्णालयांत जाऊन जखमींची भेट दिली.

माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही शोकसंतप्त कुटुंबांप्रति मनापासून संवेदना व्यक्त केल्या. जखमींना लवकरात लवकर आराम मिळावा, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

Related posts

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाचे आका देवेंद्र फडणवीसच? : हर्षवर्धन सपकाळ

पोलिसांची व्हॅन अडविणाऱ्या रिया अहिरेला धमक्या आणि शिवीगाळ

आसाममधील ग्रामपंचायतीचे स्वयंपूर्ण कचरा व्यवस्थापन