बलात्काराच्या गुन्ह्यात तरुण तेजपालला १० वर्षाची शिक्षा

10-year sentence for Tarun Tejpal

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बलात्काराच्या गुन्ह्याच्या आरोपाखाली तहलकाचा माजी संपादक तरुण तेजपाल (वय ६२) याला दहा वर्षाची शिक्षा सुनावली. २०१३ मध्ये तरुण तेजपालने तेहलका या मासिकात काम करणाऱ्या सहकारी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणी त्याला अटक झाली आणि त्यानंतर २०१४ मध्ये जामिन मिळाला होता. गोवा सत्र न्यायालयाने २०२१ मध्ये या प्रकरणात त्याच्या सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. गोवा सत्र न्यायालयाचा निर्णय मुंबई गोवा खंडपीठाने रदद् करत त्याला दोषी ठरवले आणि दहा वर्षाची शिक्षा ठोठावली. (10-year sentence for Tarun Tejpal)

सुनावणीच्यावेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या तेजपालने आपण दोन मुलींचे वडील असल्याचा दावा करत दयेची याचना केली होती. पण गोवा सरकारकडून हजर असलेल्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी शिक्षेची मागणी केली. त्यानंतर गोवा खंडपीठाने शिक्षा सुनावली. (10-year sentence for Tarun Tejpal)

तेजपालांवर गुन्हा काय आहे?

२०१३ मध्ये गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थिंकफेस्ट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी तरुण तेजपालने त्याच्यासोबत काम करणाऱ्या कनिष्ठ महिला सहकाऱ्यांचं लैंगिक शोषण केले असा आरोप पिडितेने केला होता. या महिलेने असा आरोप केला होता. की हॉटेलच्या लिफ्टमध्ये तेजपाल यांनी तिचे लैगिंक शोषण केले. या प्रकरणी ३० नोव्हेंबर २०१३ रोजी तरुण तेजपालांना अटक झाली. या घटनेच्या साडेसात वर्षानंतर २०२१ मध्ये गोव्याच्या सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याचे कारण देत तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाविरुद्ध गोवा सरकारने हायकोर्टात अपील केले होते. (10-year sentence for Tarun Tejpal)

Related posts

सर्वोच्च न्यायालयात पक्ष, चिन्हावर शिवसेनेचा जोरदार युक्तीवाद

अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई जागतिक केंद्र बनेल : मुख्यमंत्री फडणवीस

दोन भावांचा तिसऱ्या भावावर हल्ला; वडील-मुलगा ठार