Womens cup : भारत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

Womens cup

Womens cup

महाराष्ट्र दिनमान डेस्क : १९ वर्षाखालील टी २० विश्वचषक क्रिकेट सामन्याच्या उपांत्य फेरीत भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी इंग्लंडलचा नऊ गडी राखून दणदणीत पराभव केला. आता भारताची अंतिम लढत दक्षिण अफ्रिका संघांबरोबर होणार आहे. दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला. क्वालालंपूर येथे सामने सुरू आहेत. (Womens cup)

भारताने इंग्लंडला ८ बाद ११३ धावांवर रोखले. त्यामध्ये डावखुरी फिरकीपटू पारुनिका सिसोदिया आणि वैष्णवी शर्माने इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलेच नाचवले. सिसोदियाने २१ धावात तीन तर शर्माने २३ धावांत प्रत्येकी तीन गडी बाद केले. (Womens cup)

इंग्लंडचे आव्हान भारताने १५ व्या षटकात एक गडी गमावून ११७ धावा करत पार केले. सलामीवीर जी. त्रिशाने २९ चेंडूत पाच चौकारसह ३५ धावा केल्या. कमलिनीने ५० चेंडूत आठ चौकारांसह नाबाद ५६ केल्या. पॉवर प्लेमध्ये भारताने बिनबाद ४४ धावा चोपल्या. अमू सुरेनकुमारच्या गोलंदाजीवर इंग्लंडची कर्णधार अबिगेल नॉरग्रोव्हने झेल सोडल्याने तिला जीवदान मिळाले. डावखुऱ्या फिरकी गोलंदाज फोबी ब्रेटने त्रिशलाला बाद केल्यानंतर कमालिनीने सानिका चाळकेबरोबर दुसऱ्या गड्यांनीसाठी नाबाद ४७ धावांची भागीदारी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. चाळकेने नाबाद ११ धावा केल्या. (Womens cup)

प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने डावाची सुरुवात चांगली केली. पाच षटकात त्यांनी ३७ धावांपर्यंत मजल मारली. बचावात्मक पवित्रा घेणारी जेमिमा स्पेन्स सिसोदियाच्या सरळ चेंडूवर झेलबाद झाली. तिने नऊ धावा केल्या. स्वीप शॉटचा प्रयत्न करणाऱ्या टुडी जॉन्सनला सिसोदियाने बोल्ड केले. त्यानंतर डेविना पेरिनन आणि नॉरग्रोव्हने इंग्लंडचा डाव सावरला. पेरिनने ४० चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने ४५ धावा केल्या. नॉरग्रोव्हने २५ चेंडूत तीन चौकार आणि एक षटकारांसह ३० धावा केल्या. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. नॉरग्रोव्ह, पेरिन, शार्लोन स्टब्स, केटी जोन्ससह इंग्लडचे अनेक खेळाडू स्वीप शॉटस खेळून बाद झाले. इंग्लंडने १६ व्या षटकात तीन गडी गमावले. स्टब्स, प्रिशा थानावाला आणि शार्लोन लॅम्बर्ट  सलग तीन चेंडूत बाद झाले.

हेही वाचा :

रणजी स्पर्धेत विराट कोहली फ्लॉप

अफगाणिस्तान महिला संघ क्रिकेटच्या मैदानावर

वरुणची क्रमवारीत झेप

Related posts

Dhoni

Dhoni : पुढच्यावेळी योग्य संघबांधणी महत्त्वाची

BCCI Contracts

BCCI Contracts : श्रेयस, ईशानची वापसी

RCB beats PK

RCB beats PK : बेंगळरूची पंजाबला परतफेड