Vinod Kambli : विनोद कांबळीची प्रकृती खालावली

मुंबई : भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळीची प्रकृती खालावल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या ‘एक्स’वर (ट्विटर) केलेल्या पोस्टनुसार त्याची प्रकृती स्थिर असली, तरीही गंभीर आहे. (Vinod Kambli)

मागील काही आठवड्यांपासून कांबळीच्या आरोग्याबाबतच्या तक्रारी सुरू आहेत. अलीकडेच दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात कांबळी दिसला होता. त्यावेळी सचिन तेंडुलकरसोबतच्या व्हिडिओमध्ये तो अशक्त असल्याचे दिसत होते. कांबळीला मूत्रसंसर्गाचा विकार असल्याची माहिती त्याने दिली होती. “माझी पत्नी माझी खूप काळजी घेते. अजय जडेजाही मला भेटायला आला होता. एका महिन्यापूर्वी मी चक्कर येऊन पडलो. त्यावेळी डॉक्टरांनी मला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता,” असे कांबळीने एका यू-ट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

त्यानंतर, शनिवारी कांबळीला ठाण्यातील आकृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. एका चाहत्याने रुग्णालयात कांबळीसोबतचा व्हिडिओही पोस्ट केला असून त्यामध्ये कांबळी अंगठा उंचावून ‘थम्स अप’ करताना दिसत आहे. (Vinod Kambli)

हेही वाचा :

Related posts

‌Bengal Record : बंगालचा विक्रमी धावांचा पाठलाग

Mohammed Shami : शमीचा समावेश अद्याप दूरच

Tanush Kotian : तनुष कोटियनला ऑस्ट्रेलियाचे तिकीट