जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात शनिवारी लष्कराचे वाहन दरीत कोसळले. त्यात चार जवानांचा मृत्यू झाला. त्यांचे वाहन वुलर व्ह्यूपॉईंटजवळ रस्त्यावरून घसरले आणि ते खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत एक जवान जखमी झाला. (vehicle falls into gorge)
बांदीपोरा जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मसरत इकबाल वानी यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘येथे ५ जखमींना आणले होते. त्यापैकी दोघांचा झाला होता. तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी श्रीनगरला पाठवण्यात आले आहे.’
इक्बाल म्हणाले की, गंभीर जखमी झालेल्या तिघांवर येथे प्राथमिक उपचार करण्यात आले.(vehicle falls into gorge) संध्याकाळपर्यंत दुर्घटनेतील मृतांची संख्या चार झाली.
दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) वाहन रस्त्यावरून घसरून झालेल्या अपघाता पाच सैनिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेत चालकासह पाच जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर अवघ्या आठवड्यानंतर ही घटना घडली आहे.
हे वाहन सहा वाहनांच्या ताफ्यातील होते. ते पूंछजवळ रस्त्यावरून घसरले आणि नाल्यात कोसळले. गेल्या महिन्यापासून खोऱ्यात थंडीची लाट पसरली आहे. शनिवारी काश्मीरच्या काही भागांना धुक्याच्या दाट थराने वेढले आहे. हवामान अधिकाऱ्यांनी सांगितले की, खोऱ्याच्या मध्य आणि वरच्या भागात जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अधिकाऱ्यांनी नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. प्रतिकूल हवामानात अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.(vehicle falls into gorge)
#WATCH | Jammu and Kashmir: 2 soldiers died, 3 injured after an Army vehicle veered off the road and plunged into a deep gorge near the Wular Viewpoint in the Bandipora district pic.twitter.com/lQ8MAoY9ca
— ANI (@ANI) January 4, 2025
हेही वाचा :
भारताचे पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’